BJP And Ram Mandir Controversy Sarkarnama
देश

BJP And Ram Mandir Controversy : राम मंदिर देणगी घोटाळ्यात ट्विस्ट; भाजप नेत्याचाच गंभीर दावा, ‘चंपत राय यांच्यासह तिघांना होऊ शकतो तुरुंगवास’

BJP leader Vinay Katiyar alleges major donation scam Ayodhya Ram Mandir trust, raises questions over top officials : भाजप नेते आणि बजरंद दलाचे संस्थापक विनय कटियार यांनी थेट राम मंदिर ट्रस्टशी संबंधित वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर संशय व्यक्त करत मोठा दावा केला आहे.

Pradeep Pendhare

Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्या येथील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणाने आता मोठे राजकीय वळण घेतले असून, विशेष म्हणजे, या प्रकरणात सत्ताधारी भाजपमधूनच गंभीर आरोप समोर आले आहेत.

भाजप नेते आणि बजरंद दलाचे संस्थापक विनय कटियार यांनी थेट राम मंदिर ट्रस्टशी संबंधित वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर संशय व्यक्त करत मोठा दावा केला आहे.

विनय कटियार यांनी आरोप करत म्हटले की, श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) भाविकांकडून जमा झालेल्या देणगी निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रकरणात मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, प्रशासक गोपाल राव आणि माजी विश्वस्त अनिल मिश्रा यांची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला. एवढेच नव्हे तर आगामी काळात या तिघांना तुरुंगवासही होऊ शकतो, असे विधान करत त्यांनी खळबळ उडवून दिली.

कटियार यांनी पुढे सांगितले की, या गंभीर प्रकरणाबाबत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी चर्चा केली होती. पुढे काय होणार? अशी विचारणा पंतप्रधानांनी केली असता, परिस्थिती नियंत्रणात येईल; मात्र चंपत राय, गोपाल राव आणि अनिल मिश्रा यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे आपण सांगितल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, या कथित आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी तपासाला वेग दिला असून आरोपी अविनाश शुक्ला याची अयोध्येतील एसओजी कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली आहे.

तपास यंत्रणांनी आता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मागील पाच वर्षांतील सर्व आर्थिक व्यवहारांचे फेरलेखापरीक्षण करण्याची तयारी सुरू केली आहे. यात मंदिर बांधकामासाठी झालेला खर्च, भाविकांकडून आलेल्या रोख देणग्या, सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या नोंदींची सखोल पडताळणी केली जाणार आहे. ट्रस्टमधील प्रत्येक व्यवहार तपासाच्या कक्षेत आणला जात आहे.

आरोपींकडून लाखोंची रक्कम जप्त

तपासादरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अविनाश शुक्लाकडून 20.39 लाख, करुणेश पांडेकडून 18.07 लाख, अनुकल्प मिश्राकडून 16.82 लाख, लवकुश मिश्राकडून 14.25 लाख, रामाशंकर मिश्राकडून 7.32 लाख आणि रामाशंकर यादव उर्फ टिन्नूकडून एक लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

सोने, चांदी, डाॅलर जप्त

याशिवाय 11 ग्रॅम सोने, 375 ग्रॅम चांदी आणि 1021 अमेरिकन डॉलरही जप्त करण्यात आले. तपासादरम्यान अयोध्येतील एका योग केंद्रातून ‘रामराज्य कोष’ नावाची आणि पेटीएम QR कोड असलेली संशयास्पद देणगी पेटी देखील जप्त करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अविनाश शुक्ला गेल्या जवळपास दहा वर्षांपासून याच ठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रशासकीय व्यवस्थेमुळे श्रद्धास्थानाला तडा

अयोध्येतील राम मंदिरासारख्या देशाच्या श्रद्धास्थानाशी संबंधित या कथित देणगी घोटाळ्यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT