Ayodhya Ram Mandir latest news : राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत असून या प्रकरणात नवे घडामोडी समोर येत आहेत. देणगीतील अपहाराची रक्कम कथितपणे शेअर बाजारात गुंतवण्यात आल्याचा तपासात संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर देणगी मोजणी विभागातील 23 कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आली असून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे.
देणगी चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राम मंदिर (Ram Mandir) प्रशासनाने रोख रक्कम हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा नियम अधिक कडक केले आहेत. खिसेविरहित गणवेश, वाढीव तपासणी, कठोर देखरेख आणि कामाच्या तासांमध्ये वाढ अशा उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. या बदलांमुळे कामकाज अधिक कठीण झाल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
कर्मचाऱ्यांच्या (Worker) मते, जबाबदाऱ्या वाढल्या असल्या तरी वेतनात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे, देणगी व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी हे बदल आवश्यक असल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, देणगी अपहार प्रकरणात आरोपी आणि त्याच्या नातेवाइकांच्या 30 बँक खात्यांवर गोठवण्याची कारवाई करण्यात आली आहे. तपासात अपहाराची रक्कम शेअर बाजारात गुंतवल्याचा संशय असून उत्तर प्रदेश सरकारचे विशेष तपास पथक (SIT) विविध स्तरांवर तपास करत आहे.
या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवावी आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) यांच्यामार्फत लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.