Ayodhya Ram Mandir Donation Scam : राम मंदिरात मोठा घोटाळा? दान चोरी प्रकरणात 40 कर्मचारी हटवले; योगी सरकारकडे SIT चा 150 पानी अहवाल

SIT report on Ayodhya Ram Mandir case: अयोध्येतील राममंदिरात दानपेटीतील रकमेच्या कथित चोरीप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून, दानाची मोजणी करणाऱ्या तब्बल 40 कर्मचाऱ्यांना अखेर कामावरून हटविण्यात आले आहे.
Yogi government receives Ram Mandir report
Yogi government receives Ram Mandir reportSarkarnama
Published on
Updated on

Ayodhya Temple Donation Controversy: अयोध्येतील राममंदिरात दानपेटीतील रकमेच्या कथित चोरीप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून, दानाची मोजणी करणाऱ्या तब्बल 40 कर्मचाऱ्यांना अखेर कामावरून हटविण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली असून आता बँकेमार्फत नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, ज्या ठिकाणी दानाची मोजणी केली जाते त्या परिसरातील सुरक्षा आणि देखरेख व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) मंदिर ट्रस्टशी संबंधित पदाधिकारी आणि काही अधिकाऱ्यांना अयोध्या सोडू नये, असे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.

तब्बल सहा दिवस तपास करून लखनऊ येथे परतलेल्या एसआयटीकडून सोमवारी सुमारे 150 पेक्षा अधिक पानांचा प्राथमिक तपास अहवाल उत्तर प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याकडे सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालानंतर मोठी प्रशासकीय कारवाई सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.

यापूर्वी हा अहवाल रविवारीच मुख्यमंत्री कार्यालयाकडे जाणार असल्याची चर्चा होती. मात्र काही वरिष्ठ अधिकारी अजूनही अयोध्येतच (Ayodhya) थांबून सविस्तर माहिती संकलित करत असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एसआयटीचे पथक पुन्हा अयोध्येत दाखल होऊ शकते आणि या चौकशीसाठी आणखी दोन ते तीन आठवड्यांचा अतिरिक्त कालावधी दिला जाण्याची शक्यता आहे.

Yogi government receives Ram Mandir report
Fake Medicine Scam : राज्यात तुकाराम मुंढेंचा धडाका; बनावट औषधांचा मोठा खेळ उघड, महाराष्ट्रासह 4 राज्यांत खळबळ

दानरकमेची मोजणी करण्यासाठी जवळपास 40 जणांचे स्वतंत्र पथक कार्यरत होते. या पथकात मंदिर ट्रस्ट तसेच बँकेचे कर्मचारी सहभागी होते. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ट्रस्टचे वरिष्ठ पदाधिकारीही उपस्थित राहत होते. मात्र तपासादरम्यान दान मोजणी प्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळल्यानंतर सर्वांना तातडीने हटवण्यात आले आहे.

Yogi government receives Ram Mandir report
Thalapathy Vijay Big Economic Push : थलपती विजय सरकार 93 हजार नोकऱ्या देणार; तामिळनाडूसाठी काय आहे प्लॅन

योगी सरकारकडे फिर्यादीची शिफारस

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची माहिती सात पेनड्राइव्हमध्ये डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. प्राथमिक तपास अहवालात सुमारे 150 जणांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, दान चोरी प्रकरणाशी संबंधित व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्याची शिफारसही एसआयटीने केली आहे.

चौकशी अहवालात धक्कादायक निरीक्षण

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मंदिरातील देखरेख आणि सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढील काही दिवसांत मोठे निर्णय आणि कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अखिलेशसह विरोधकांचे गंभीर आरोप

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीत कोट्यवधी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी आणि याचिकाकर्त्यांनी केला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह काही नेत्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. काहींनी तब्बल पाच ते साडेसात कोटी तर काहींनी चक्क 200 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा केला आहे.

10 लाख रुपयांची रोकड जप्त

दान मोजणी विभागातील अनुकल्प मिश्रा आणि लवकुश मिश्रा या कर्मचाऱ्यांची नावे समोर आली. एका कर्मचाऱ्याच्या घरातून आणि शेणाखाली लपवलेली तब्बल 10 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपात राय यांनी सुरुवातीला प्राथमिक पुराव्यांच्या अभावी चोरीचे आरोप फेटाळले होते. प्रकरण सर्वोच्च न्यायालय पोहचल्यावर कसून चौकशी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com