Iqbal Ansari Sarkarnama
देश

Ram Mandir : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला येणार का? बाबरी मशिदीचे पक्षकार थेटच बोलले...

Iqbal Ansari : इक्बाल अन्सारी यांचे वडील मूळ पक्षकार...

Rajanand More

Ayodhya News : अयोध्येत 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी अनेकांना निमंत्रित केले जात आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकही आमने-सामने उभे ठाकले आहेत. या सोहळ्यावर बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

इक्बाल अन्सारी (Iqbal Ansari) यांचे वडील दिवंगत हाशिम अन्सारी (Hashim Ansari) हे बाबरी मशिदीचे मूळ पक्षकार आहेत. त्यांच्या निधनानंतर इक्बाल अन्सारी यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मशिदीच्या बाजूने किल्ला लढवला. त्यामुळे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने त्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. हाशिम अन्सारी यांनी कायदेशीर लढा सुरू केला होता.

मीडियाशी बोलताना अन्सारी यांनी आपल्याला निमंत्रण मिळाले तर या सोहळ्याला उपस्थित राहीन, असे स्पष्ट केले आहे. अयोध्येमध्ये (Ayodhya) आता हिंदू-मुस्लिम असा वाद नाही. आम्ही कोर्टाचा निर्णय स्वीकारला आहे. अयोध्येचा नागरिक या नात्याने इथे राम मंदिर होत असल्याचा मलाही अभिमान आहे, अशी भावना अन्सारी यांनी व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्येमध्ये आता कधीही हिंदू-मुस्लिम वाद होणार नसल्याचे सांगत अन्सारी म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि आता मंदिरही उभे राहिले. आमच्यासाठी हे प्रकरण आता संपले आहे. कोर्टाच्या निकालानंतर मुस्लिम नागरिकांनी त्याचा सन्मान केला. राम मंदिराचा आनंद वाटतो. मला अजून सोहळ्याचे निमंत्रण आलेले नाही, आल्यास नक्की जाईन, असेही अन्सारी यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींचे कौतुक

इक्बाल अन्सारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) कौतुक केले आहे. मोदींच्या काळात अयोध्येचा चांगला विकास झाला. अयोध्येत एक छोटे रेल्वेस्थानक होते. आता ते तीनमजली झाले आहे. इथे विमानतळही नव्हते. मोदींमुळे हे बदल झाले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवेळी मी फुले टाकून त्यांचे स्वागत केले, असे अन्सारी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT