BJP MLA : 'मी मुख्यमंत्री असल्यासारखाच… मुख्य सचिव, कलेक्टरही नाही म्हणणार नाहीत;' भाजप आमदार नाराज?

Goapl Bhargav : गोपाळ भार्गव माजी मंत्री आहेत...
Gopal Bhargav
Gopal BhargavSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यानंतर ज्येष्ठ आमदारांची नाराजी आता बाहेर येऊ लागली आहे. गोपाळ भार्गव यांनीही एका कार्यक्रमात बोलताना नऊ वेळा आमदार झालेले मुख्यमंत्र्यांसारखेच असतात, असे विधान केले आहे.

भार्गव (Goapl Bhargav) हे माजी मंत्री असून रहली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. रविवारी विकसित भारत (Vikasit Bharat) संकल्पयात्रेदरम्यान त्यांनी नाराजीचे संकेत दिले. ते म्हणाले, लोक मला म्हणतात की, तुमचे मंत्रिपद गेले आता काय होणार? मी त्यांना एवढंच सांगेन की, मी गोपाळ भार्गव बोलतोय, असं सांगितल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव, कलेक्टरही मला कोणत्याही कामासाठी नाही, म्हणणार नाहीत. (Latest Marathi News)

Gopal Bhargav
BJP MP Pratap Simha : घुसखोरी प्रकरणातील भाजप खासदाराच्या भावाच्या अटकेने तापले राजकारण

मी 20 वर्षे विरोधक म्हणून, विधानसभेच्या (Assembly) माध्यमातून आपली मदत केली आहे. 2003 मध्ये भाजप (BJP) सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री होतो. कृषी, प्रशासन, सहकार असे आठ मोठे विभाग माझ्याकडे होते. आजपर्यंतच्या मध्य प्रदेशच्या इतिहासात हे कुणालाही जमले नाही. तरुण तर मला आजही मंत्रीच समजतात, असे भार्गव यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कुटुंबातील ज्येष्ठाला काहीतरी त्याग करावाच लागतो, असे सांगताना भार्गव यांची नाराजी समोर आली. आता नवीन लोकांना घ्यायचे असल्याचे पक्षाने सांगितले. मी त्यांना ठीक म्हणालो. तुमची आजपर्यंत केलेली सेवाच माझी संपत्ती आहे. मतदारसंघात विविध योजनांचा अधिकाधिक फायदा मिळवून दिल्याचेही भार्गव यांनी सांगितले.

दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची निवड झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतही त्यांचे नाव नव्हते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ आमदारांमधील सुप्त नाराजी आता बाहेर येऊ लागली आहे. भार्गव यांनी यावर थेट भाष्य केले नसले तरी त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे होता, हे स्पष्टपणे दिसते.

Gopal Bhargav
Ram Mandir : निमंत्रणाच्या वादावर अखेर मुख्य पुजारीच बोलले; उद्धव ठाकरे, राऊतांवर संतापले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com