Sheikh Hasina Sarkarnama
देश

Shaikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा! नेमकं प्रकरण काय?: भारतातून मायदेशी परतावं लागणार

Shaikh Hasina Death Penalty: मानवतेविरोधातील गुन्ह्यात दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली आहे.

Amit Ujagare

Shaikh Hasina Death Penalty: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशच्या कोर्टानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. बांगलादेशात मृत्यूदंडासाठी फाशी दिली जात असल्यानं त्यांना फाशीच्या शिक्षेला सामोरं जाऊ लागू शकतं. ढाका इथल्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलनं (ICTBD) त्यांच्याविरोधात मानवतेविरोधातील तीन गुन्ह्यांत दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली आहे.

नेमकं प्रकरण काय?

ढाक्याच्या इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनलनं शेख हसीना यांना मानवतेविरोधातील गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं आहे. २०२४ मध्ये बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलना दरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. यामध्ये अनेकांच्या हत्या झाल्या होत्या, या हत्याकांडांचा मास्टरमाईंड घोषित करत शेख हसीना यांना ट्रिब्युनलनं दोषी ठरवलं आहे. या आंदोलनांमधील दोन आरोपांमध्ये त्यांना दोषी मानण्यात आलं आहे. हसीना यांच्यासह दुसऱे आरोपी माजी गृहमंत्री असदुज्जमां खान यांना १२ लोकांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. तसंच याप्रकरणातही त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर तिसरा आरोपी माजी IGP (पोलीस अधिकारी) अब्दुल्ला अल-ममून यांना ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ममून हे माफीचे साक्षादार बनले आहेत.

तीन प्रकरणांत दोषी

शेख हसीना यांना तीन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. न्यायदानाच्या कामात अडथळना निर्माण करणे, हत्या करण्याचे आदेश देणे आणि हत्याकांड सुरु असताना ते रोखण्यासाठी उपाययोजना न करणे या प्रकरणांचा यामध्ये समावेश आहे. याप्रकरणात ट्रिब्युनलनं बांगलादेशचे माजी पोलीस प्रमुख चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांची मृत्यूदंडापासून सुटका केली. कारण ते माफीचे साक्षीदार बनले.

नेमका काय ठपका ठेवला?

याप्रकरणात अनेक अहवालांचा दाखला देत ट्रिब्युनलच्या न्यायाधिशांनी म्हटलं की, कोर्टासमोर पुरावे आले आहेत त्यानुसार, ढाक्यात आंदोलन सुरु असताना या आंदोलकांवर हेलिकॉप्टरमधून तसंच घातक शस्त्रांचा वापर करण्याचे आदेश दिले होते. तसंच हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्यांना सरकारनं वैद्यकीय उपचार नाकारले. पीडितांना बनावट नावांनी रुग्णालयात भरती करण्यात आलं तसंच त्यांच्यावर झाडलेल्या बंदुकीच्या गोळ्यांचे शरिरावरील निशाण लपवण्यात आले. तसंच एका डॉक्टरला अबू सईदचा पोस्टमार्टम अहवाल बदलण्याची धमकी देखील देण्यात आली.

453 पानांचं निकालपत्र

न्या. मोहम्मद गुलाम मुर्तुजा मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखालील इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल बांगलादेशनं (ICTBD) सोमवारी याप्रकरणावर शिक्षा सुनावली. या सुनावणीचं थेट प्रसारणही टीव्हीवरुन करण्यात आलं. न्यायाधीशांनी यावेळी शेख हसीना यांना मानवतेविरोधात गंभीर गुन्हे केल्याचा ठपका ठेवत सहा खंडांमध्ये विभागलेल्या ४५३ पानांच्या निकालपत्रातील महत्वाचे आदेश वाचून दाखवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT