Raosaheb Danve News : मित्र पक्षाला शत्रू समजू नका, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर जालन्यात रावसाहेब दानवेंकडून युतीसाठी पुढाकार!

Raosaheb Danve On Arjun Khotkars Stand : खोतकर यांनी महापौर पदाचा उमेदवार परस्पर जाहीर केल्यामुळे रावसाहेब दानवे कमालीचे दुखावले गेले आहेत. एकीकडे युतीचा प्रस्ताव आणि दुसरीकडे महापौर पदाचा उमेदवार जाहीर करायचा हे बरोबर नाही.
Raosaheb Danve Talk On Alliance With Arjun Khotkar News
Raosaheb Danve Talk On Alliance With Arjun Khotkar NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  • मुख्यमंत्री फडणवीसांच्या सल्ल्यानंतर जालना महापालिकेत युतीसाठी रावसाहेब दानवे यांनी पुढाकार घेण्याचे संकेत दिले.

  • महापालिकेतील सत्ता समीकरणे साधण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्याचे काम सुरू झाले आहे.

  • या हालचालीमुळे जालन्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

Jalna Municipal Corporation Election : जालना नगर परिषदेचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत आपल्या पक्षाचा महापौर बसवण्यासाठी जिल्ह्यातील दोन बडे नेते रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना आणि भाजपच्या या दोन नेत्यांमध्ये सध्या टोकाचा संघर्ष सुरू आहे. महापालिकेसाठी युती करायची की स्वबळावर लढायचे? याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी युतीचा प्रस्ताव दोन आठवड्यांपूर्वीच भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांच्यामार्फत पाठवला होता. मात्र युतीच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या प्रस्तावावर अद्याप कुठलीच भूमिका जाहीर केली नाही. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार कैलास गोरंट्यात यांनी सुरुवातीपासूनच महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्धार बोलून दाखवला. स्वबळावर लढल्यास भाजपचाच महापौर बसेल, असा दावा गोरंट्याल यांनी केला आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. यातून एकमेकांवर टोकाची टीका ते धमकावण्याचे प्रकारही मध्यंतरीच्या काळात घडले. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी जालन्यात तयारी मात्र जोरात सुरू आहे. अर्जुन खोतकर यांनी महापौर पदाचा उमेदवार परस्पर जाहीर केल्यामुळे रावसाहेब दानवे कमालीचे दुखावले गेले आहेत. एकीकडे युतीचा प्रस्ताव द्यायचा आणि दुसरीकडे महापौर पदाचा उमेदवार जाहीर करायचा हे बरोबर नाही. युतीची भाषा करायची आणि आमच्यावर टीकाही करायची यातून कुठेतरी तुमचा संयम सुटला असल्याचे दिसून येते.

Raosaheb Danve Talk On Alliance With Arjun Khotkar News
Arjun Khotkar : जालन्यात युतीसाठी भाजप इच्छूक नाही; अर्जुन खोतकरांकडूनही 'बी प्लान' तयार!

महापालिकेचे निवडणूक युती म्हणून लढाईची असेल तर दोन्ही बाजूने संयम बाळाला गेला पाहिजे. महापालिकेवर महायुतीचा भगवा तर फडकणारच, असा विश्वास व्यक्त करतानाच रावसाहेब दानवे यांनी अजूनही आपण युतीसाठी शिवसेनेसोबत एकत्र बसण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्र पक्षाला शत्रू समजू नका, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला. यानंतर स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांची भाषा काहीशी बदलली आहे.

Raosaheb Danve Talk On Alliance With Arjun Khotkar News
Raosaheb Danve-Arjun Khotkar : खोतकर- दानवेंची एकत्र येण्याची भाषा, तर पडद्यामागे वेगळ्याच हालचाली! जालन्यात युती की चकवा?

रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर ताठर भूमिका घेतल्याचा आरोप केल्यानंतरही आम्ही एकत्र बसू आणि युतीवर चर्चा करू असे सांगत युतीच्या अशा अजूनही जिवंत असल्याचे संकेत दिले आहेत. आता अर्जुन खोतकर यांच्याकडून रावसाहेब दानवेंना कसा प्रतिसाद मिळतो? यावर युतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. अर्जुन खोतकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांना शिवसेना पक्षात आणून विरोधकांवर कुरघोडी केली आहे.

पहिली अडीच वर्ष कोणाचे? यावर अडले

विष्णू पाचफुले यांचे नाव महापौर पदासाठी जाहीर करत पहिले अडीच वर्ष महापौर पद शिवसेनेकडे दिले गेले तरच युतीवर चर्चा होऊ शकते, असा पावित्र खोतकर यांनी घेतला आहे. तिकडे भाजपमधून याला कैलास गोरंट्याल यांचा तीव्र विरोध असल्याचे बोलले जाते. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी युती असताना विरोधात काम केल्याचा राग रावसाहेब दानवे यांच्या मनात अजूनही कायम आहे.

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने तो व्यक्त करून अर्जुन खोतकर यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न दानवे गोरंट्याल यांच्यामार्फत करत आहेत. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या भाषणातून मित्र पक्षाला शत्रू समजू नका, असा सूचक संदेश दिल्यामुळे दानवे यांच्या भूमिकेत काही बदल होतो का? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

FAQs

1. रावसाहेब दानवे यांना युतीसाठी पुढाकार का घ्यावा लागत आहे?
मुख्यमंत्री यांनी दिलेल्या राजकीय रणनीतीनुसार महापालिकेत मजबूत समीकरण तयार करण्यासाठी हा पुढाकार घेतला जात आहे.

2. जालना महापालिकेत कोणत्या पक्षांची युती होण्याची शक्यता आहे?
भाजप आणि सहयोगी पक्षांमध्ये युती होण्याची चर्चा आहे.

3. या निर्णयाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
युती झाल्यास विरोधकांवर दबाव वाढेल आणि महापालिकेत सत्ता मिळवण्याची शक्यता वाढेल.

4. विरोधकांची या हालचालीवर प्रतिक्रिया काय आहे?
विरोधक सावध झाले असून त्यांच्या रणनीतीत बदल करण्याची चिन्हे दिसत आहेत.

5. पुढील काही दिवसांत कोणती राजकीय घडामोडी अपेक्षित आहेत?
युतीची औपचारिक घोषणा, जागावाटप, आणि निवडणूक प्रचाराची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com