Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना शह देण्यासाठी येवल्यात नवा प्रयोग, शरद पवार अन् एकनाथ शिंदेंचा पक्ष एकत्र

MLA Kishor Darade and Manikrao Shinde join hands : येवल्यात छगन भुजबळांच्या विरोधात शहर विकास आघाडीचा नवा प्रयोग होत आहे. शिवसेना आमदार किशोर दराडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव शिंदे एकत्र आले आहेत.

Manikrao Shinde, Kishore Darade, Chhagan Bhujbal
Manikrao Shinde, Kishore Darade, Chhagan Bhujbalsarkarnama
Published on
Updated on

Yeola Politics : राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना शह देण्यासाठी येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना शिंदे गटाने युती केली आहे. खास भुजबळांना धोबीपछाड देण्यासाठी शिवसेना (शिंदे गटाचे) किशोर दराडे व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव शिंदे एकत्र आले आहेत.

येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शहर विकासासाठी एकत्र आले आहेत. येवल्याच्या राजकारणात फार दिवसांपासून या शहर विकास आघाडीच्या प्रयोगाची चर्चा होती. तो प्रयोग आता प्रत्यक्षात झाला आहे.

शिवसेनेचे आमदार किशोर दराडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांनी पुढाकार घेत या युतीची घोषणा केली आहे. शहर विकासासाठी एकत्र येत आहोत असे दोन्ही बाजूंनी सांगण्यात आले. दरम्यान यामुळे मंत्री छगन भुजबळ यांना येवला नगरपरिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.


Manikrao Shinde, Kishore Darade, Chhagan Bhujbal
Sinnar Politics : माणिकराव कोकाटेंचा समर्थक शिवसेनेला जाऊन मिळाला, भाजपलाही झटका, सिन्नरच्या राजकारणात मोठी उलथापालथ

माणिकराव शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेला छगन भुजबळ यांच्याविरोधात निवडणूक लढवली. शिंदे यांच्यासाठी शरद पवार यांनी येवल्यात सभा घेतली होती. मात्र छगन भुजबळांनी शिंदे यांचा निवडणुकीत पराभव केला होता. तर भुजबळांचे दराडे बंधूंसोबतही संबंध बिघडलेले आहेत. त्यापार्श्वभूमीवर दराडे बंधू व माणिकराव शिंदे भुजबळांना येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीत शह देण्यासाठी एकत्र आले आहेत. रुपेश दराडे यांना नगराध्यक्षपदासाठी शिवसेना(शिंदे)गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.


Manikrao Shinde, Kishore Darade, Chhagan Bhujbal
Jalgaon Politics : उद्धव ठाकरेंच्या ३०० कार्यकर्त्यांवर गुलाबरावांनी केली जादू, सगळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल

छगन भुजबळ आजारी असल्याने पुतणे समीर भुजबळ हे येवल्याच्या मैदानात उतरले आहेत. शिवसेना(शिंदे) पक्षाच्या विरोधात समीर भुजबळांचे भाजप सोबत युती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशात दराडे बंधू व शिंदेची झालेली युती समीर भुजबळांना धक्का देणारी आहे.

या युतीमुळे येवला नगरपरिषदेतील लढत भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) – राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात होऊ शकते. त्यामुळे आता भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यातील निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com