Anwarul Azim Sarkarnama
देश

Bangladesh MP Death : बांगलादेशच्या खासदाराचा कोलकातामधील फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह!

MP Anwarul Azim Death in Kolkata : नऊ दिवसांपासून होते बेपत्ता, पोलिसांनी व्यक्त केला हत्येचा संशय

Mayur Ratnaparkhe

Kolkata Crime News : बांगलादेशमधील खासदार अनवारुल आजिम यांचा मृतदेह कोलकातामध्ये आढळल्याने एक खळबळ उडाली आहे. बांगलादेशमधून उपचारासाठी ते पश्चिम बंगालमध्ये आले होते. अशीही माहिती समोर आली आहे की, मागील नऊ दिवसांपासून ते बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह बुधवारी कोलकातामधील न्यूटाउन येथे आढळून आला. पोलिसांनी या खासदाराची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला आहे.

अनवारुल आजिम(Anwarul Azim ) 12 मे रोजी उपचारासाठी बांगलादेशमधून पश्चिम बंगलला आले होते. ते त्यांच्या मित्राकडे बारनगर येथे थांबले होते. 13 मे रोजी त्यांनी सांगितले की ते उपचार घेण्यासाठी डॉक्टरांकडे जात आहेत. तेव्हापासून त्यांचा कोणताही ठावठिकाणा नव्हता. 14 मे रोजी ते बेपत्ता झाल्याचा रिपोर्ट पोलीस ठाण्यात नोंदवला गेला. बांगलादेशच्या दूतावासालाही याबाबत कळवलं गेलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नऊ दिवसांपासून होते खासदार -

बांगलादेशच्या खासदाराच्या शोधात पोलीस प्रयत्नशील होते. तपासादरम्यान त्यांचे शेवटचे लोकेशन बिहारमधील मुजफ्परपुर येथील आढळले होते. कोलकाताहून पोलिसांचे एक पथक बिहारला गेले, परंतु ते बेपत्ता झाल्याच्या नऊ दिवसानंतर अनवारुल आजिम यांचा मृतदेह कोलकाताच्या न्यू टाउन येथे आढळला आहे. पोलिसांना संशय आहे की, त्यांची हत्या झाली आहे.

अनवारुल आजिम बांगलादेशच्या झिनाईदह-4 लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. अचानक ते बेपत्ता झाल्याने पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात खळबळ माजली होती. पोलिसांनी त्या सर्व ठिकाणी त्यांचा शोध घेतला, जिथे ते जाऊ शकतील असं वाटत होतं. पोलिसांनी म्हटले होते की ज्या गाडीत ते चढले होते, तिचे लोकेशन न्यू टाऊन भागात दिसत होते.

यानंतर पोलिसांनी बैरकपुर आणि त्याच्या आसापासच्या भागात त्यांचा तपास सुरू केला, परंतु ते सापडले नाहीत. पोलिसांनी सांगितले की 12 मे रोजी अनवारुल आजिम आपले एक मित्र गोपाल विश्वास यांच्या घरी पोहचले होते. 12 मे रोजी रात्री ते तेथेच थांबेले. 13 मे रोजी उपचारासाठी बाहेर पडले आणि तेव्हापासून ते बपत्ता झाले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT