Kolkata High Court : निवडणुकीच्या रणधुमाळीत कोलकाता उच्च न्यायालयाचा ममता सरकारला मोठा झटका!

Mamata Banerjee News : 2011 पासूनची तब्बल पाच लाख ओबीसी प्रमाणपत्रं केली रद्द
mamta Banerjee
mamta Banerjeesarakarnama

Mamata Banerjee Government : कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी पश्चिम बंगालमधील ममता सरकारला मोठी झटका दिला आहे. उच्च न्यायालयाने 2011नंतर आतापर्यंत जारी केले गेलेले तब्बल पाच लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ओबीसी प्रमाणपत्रांना नोकरीच्या अर्जांमध्ये सुद्धा मान्यता नसेल.

एका याचिकेवर सुनावणी करताना कोलकाता उच्च न्यायालयाने(Kolkata High Court) मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार उच्च न्यायालयाने 2011नंतर जारी केलेले सर्व ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयाचे अनेक दूरगामी परिणाम पााहायला मिळू शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

mamta Banerjee
Prashant Kishor News : महाविकास आघाडीच्या जागा सांगतानाच प्रशांत किशोर यांनी भाजपबाबत केलं मोठं विधान

आदेशात उच्च न्यायालयाने काय म्हटले? -

कोलकाता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती तपब्रत चक्रवर्ती आणि राजशेखर मंथा यांच्या खंडपीठाने बुधवारी एका जनहीत याचिकेच्या सुनावणीत हा निर्णय दिला. या जनहीत याचिकेत ओबीसी प्रमाणपत्र जारी करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले गेले आङेत. या प्रकरणी न्यायालयाने नर्देश देताना म्हटले की, ओबीसी प्रमाणपत्र 1993च्या कायदानुसार बनलेल्या पश्चिम बंगाल मागास आयोगाकडून निश्चित झालेल्या प्रक्रियेनुसाच बनवले जावेत.

शिक्षक भरती प्रकरणानंतर आता कोलकाता उच्चा न्यायालयाने ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) सरकारला हा आणखी एकम मोठा झटका दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे दाखल केल्या गेलेल्या याचिकेवर न्यायालयाचा हा निर्णय समोर आला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

mamta Banerjee
Lok Sabha Election News : देशभरात भाजपला किती जागा मिळणार; अखिलेश यादव, केजरीवाल, खर्गेंनी सांगितला थेट आकडाच !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com