Delhi Bomb Threat : अमित शाहांचे गृह मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दिल्लीत खळबळ

Union Home Minstry : दिल्लीत काही दिवसांपुर्वीच शाळा व रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पोलिस यंत्रणेची चांगली धावपळ उडाली होती.
North Block Bomb Threat
North Block Bomb ThreatSarkarnama
Published on
Updated on

New Delhi Bomb Threat News : मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्ली बॉम्बच्या धमकीने (Delhi Bomb Threat) चांगलीच हादरली आहे. शाळा, रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे ई-मेल पाठवण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणाही कामाला लागल्या होत्या. पण याठिकाणी संशयास्पद काहीच आढळून आले नव्हते. आता बुधवारी पुन्हा दिल्लीत खळबळ उडाली आहे. यावेळी थेट केंद्रीय गृह मंत्रालयाला (Home Ministry) टार्गेट करण्यात आल्याने तपास यंत्रणांची धावपळ उडाली आहे.

दिल्लीत गृह मंत्रालय (Home Ministry) असलेल्या नॉर्थ ब्लॉक इमारतीत बॉम्ब ठेवल्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर तातडीने पोलिसांसह (Police) अग्निशमन विभाग, डॉग स्कॉड आदी पथकांकडून शोधमोहिम हाती घेण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. (Latest Marathi News)

North Block Bomb Threat
Election Commission News : अग्निवीर, संविधान, धार्मिक मुद्यांवर बोलू नका! निवडणूक आयोगाने भाजपसह काँग्रेसला फटकारले

दिल्ली अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, ‘नॉर्थ ब्लॉकमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल आला होता. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा कॉल होता. शोधमोहिम सुरू असून आतापर्यंत काहीही हाती लागलेले नाही.’ नॉर्थ ब्लॉकमध्ये गृह मंत्रालयासह अनेक महत्वाची मंत्रालये आहेत. (Delhi Latest News)

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच राजधानी दिल्लीतील शाळा आणि रुग्णालयांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचे ई-मेल आले होते. 150 हून अधिक शाळांचा त्यामध्ये समावेश होता. ई-मेल आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना तातडीने घरी पाठवून पोलिस यंत्रणेला सतर्क केले होते. एकाचवेळी एवढ्या शाळांना धमकी आल्याने तपास यंत्रणांची दमछाक झाली होती.

North Block Bomb Threat
Lok Sabha Election News : देशभरात भाजपला किती जागा मिळणार? अखिलेश यादव, केजरीवाल, खर्गेंनी सांगितला थेट आकडाच !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com