Bangladesh Election  Sarkarnama
देश

Bangladesh election Results : बांग्लादेशमध्ये BJP ला एकच जागा; NCP, पंजा, हत्ती, सायकलचा सुपडा साफ...

Bangladesh polls outcome : बीएनपीचे नेतृत्व करणारे नेते तारिक रहमान हे बांग्लादेशचे नवे पंतप्रधान असतील. त्यांनी ढाका व बोगरा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.

Rajanand More

Election Result update : बांग्लादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. बांग्लादेश नॅशनलिस्ट पक्षाने (BNP) बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. नव्या पंतप्रधानांचा शपथविधी शनिवारी होण्याची शक्यता आहे. BNP च्या नेतृत्वाखालील आघाडीला तब्बल २१२ जागा मिळाल्या आहे. या लाटेत इतर पक्षांचा सुपडा साफ झाला आहे.

तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षावर देशात निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, त्यांच्या सत्ता उलथवून टाकण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल सिटीझन पार्टी म्हणजेच NCP या पक्षाने निवडणूक लढविली होती.

निवडणुकीत एनसीपीला आपला प्रभाव पाडता आला नाही. हा पक्ष जमात-इस्लामी आघाडीत आहे. या आघाडीला ७७ जागा मिळाला आहेत. निवडणुकीमध्ये बांग्लादेश जातीय पार्टी म्हणजेच BJP ला एक जागा मिळाली आहे. या पक्षाचे निवडणूक चिन्ह बैलगाडी आहे. तर भारतातील बीजेपीचे चिन्ह कमळ आहे. निवडणुकीत इतर पक्षांना आपले खातेही उघडता आलेले नाही.

भारतातील उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह अनुक्रमे हत्ती व सायकल आहे. या चिन्हांशी मिळतीजुळती चिन्ह असलेले पक्षही बांग्लादेशच्या निवडणुकीत होते. या पक्षांचाही सुपडा साफ झाला आहे. बांग्लादेश रिपब्लिकन पार्टीचे चिन्ह हत्ती तर जातीय पक्षाचे चिन्ह सायकल आहे.

बांग्लादेश मुस्लिम लीग या पक्षाचाही निवडणुकीत प्रभाव पडलेला नाही. या पक्षाचे निवडणूक चिन्ह पंजा आहे. भारतात इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाचे चिन्ह पंजा आहे. बीएनपी पक्षाच्या लाटेत इतर सर्वच निष्प्रभ ठरले आहेत. शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षावर अंतरिम सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे या निवडणुकीत बीएनपीला टक्कर देणारा कोणताही पक्ष मैदानात नव्हता. एकट्या बीएनपीला २०९ जागा मिळाल्या आहेत.

बीएनपीचे नेतृत्व करणारे नेते तारिक रहमान हे बांग्लादेशचे नवे पंतप्रधान असतील. त्यांनी ढाका व बोगरा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. दोन्ही ठिकाणी त्यांनी विजय मिळविला आहे. ते शनिवारी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT