Minister vs Women IPS : आदेश देतोय, सस्पेंड करा... मी नाही करणार! मंत्री अन् महिला IPS मध्ये बैठकीतच खडाजंगी; अखेर महिला जिल्हाधिकारी सरसावल्या...

Haryana cabinet minister clash : दोघांमधील वाद कमी होताना दिसत नव्हता. हे ओळकून जिल्हाधिकारी अपराजिता यांनी हस्तक्षेप केला आणि विज यांना उपासना यांचे म्हणणे समजावून सांगितले.
Anil Vij news
Anil Vij newsSarkarnama
Published on
Updated on

Police suspension row : मंत्री अन् अधिकाऱ्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून सातत्याने खटके उडत असतात. मग तो विकासकामांचा मुद्दा असेल, अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा, बेकायदेशीर आदेश... अशा अनेक विषयांवरून भर बैठकांमध्ये वाद होत असतात. एका पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित करण्याच्या मंत्र्यांच्या आदेशावरून IPS अधिकाऱ्यासोबत झालेल्या त्यांच्या खडाजंगीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडीओ हरियाणातील कैथल येथील आहे. हरियाणा सरकारमधील मंत्री अनिल विज आणि पोलीस अधिक्षक उपासना सिंह यांच्यात खडाजंगी झाल्याचे दिसते. यावेळी दोघांच्यामध्ये जिल्हाधिकारी अपराजिता बसलेल्या होत्या. दोघांमधील वाद पाहून त्यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.

नेमकं काय घडलं?

कैथलमध्ये शुक्रवारी जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये जमीन विक्री फसवणूक प्रकरणावर सुनावणी सुरू होती. या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप करण्यात आले होते. अनिल विज यांनी बैठकीतच संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले. पण पोलीस अधिक्षक उपासना सिंह यांनी आपण निलंबित करू शकत नाही, असे सांगितले.

Anil Vij news
Rahul Gandhi News : एकाचवेळी गेली 11 नेत्यांची खासदारकी; तोच प्रस्ताव राहुल गांधींचंही पद घालविणार?

अधिक्षकांच्या उत्तरावरून वाद सुरू झाला. भडकलेल्या विज यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मी आदेश दिलेत, त्यानुसार सस्पेंड करा, असे विज म्हणाले. पण उपासना यांनी आपल्याला निलंबित करण्याचे अधिकार नाहीत, त्यामुळे आपण निलंबित करणार नाही, असे पुन्हा सांगितले. त्यावर विज यांनी अधिकार नसतील तर बैठकीतून निघून जा, असा संताप व्यक्त केला.

Anil Vij news
Municipal elections Result : काँग्रेसच्या सुनामीत भाजपची वाताहात; विधानसभा निवडणुकांआधी बसला मोठा धक्का, फडणवीसांनीही केला होता प्रचार

दोघांमधील वाद कमी होताना दिसत नव्हता. हे ओळकून जिल्हाधिकारी अपराजिता यांनी हस्तक्षेप केला आणि विज यांना उपासना यांचे म्हणणे समजावून सांगितले. त्या म्हणाल्या, पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे अधिकार नाही. त्या तुमच्या आदेशानुसार निलंबित करावे, असे वरिष्ठांना लेखी स्वरुपात कळतील, असे सांगितले. त्यानंतर मग हा वाद शांत झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com