Nahid Islam and Asif Mahmood Sarkarnama
देश

Nahid Islam and Asif Mahmood News : बांगलादेशातील सत्ता परिवर्तनास कारणीभूत ठरलेल्या आंदोलनातील दोन विद्यार्थी नेते बनले थेट मंत्री!

Mayur Ratnaparkhe

Bangladesh New Cabinet News : बांगलादेशात अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस यांनी गुरुवारी अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी त्यांच्या सरकारमधील विविध मंत्रालयांच्या कार्यभाराची जबाबदारी मंत्र्यांना सोपवली.

विशेष म्हणजे तब्बल 27 विभाग यूनुस यांनी स्वत:कडेच ठेवले आहेत. तर बांगादेशातील सत्ता परिवर्तनास कारणीभूत ठरलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या दोन विद्यार्थी नेत्यांनाही यूनुस यांनी मंत्री बनवलं असल्याचे समोर आले आहे.

मोहम्मद यूनुस(Mohammed Yunus) यांच्या नेतृत्वाखालील अंतिरम सरकारमध्ये 16 सदस्यीय सल्लागर समितीची घोषणा केली गेली आहे. यासाठी विविध क्षेत्रातील लोकांची निवड करण्यात आली असून, दोन विद्यार्थी नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. नाहिद इस्लाम आणि आसिफ महमूद अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनीही बांगलादेशात सध्या सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. या आंदोलनामुळेच शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन, देश सोडावा लागला आहे.

यूनुस यांनी संरक्षण, लोक प्रशासन, शिक्षण, ऊर्जा, खाद्य, जल संसाधन आणि सूचना यासारखी 27 महत्त्वाची मंत्रालयं स्वत:कडेच ठेवली आहेत. तर मोहम्मद तौहीद हुसैन यांना परराष्ट्रमंत्री बनवलं गेलं आहे. याशिवाय ज्या दोन विद्यार्थी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे, त्यापैकी नाहिद इस्लाम यांची दूरसंचार मंत्रालयाच्या प्रमुखपदी आणि आसिफ महमूद यांच्याकडे युवा आणि क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, बांगलादेशात मागील काही दिवसांपासून अराजकता पसरलेली आहे. संपूर्ण जग हे पाहत आहे. शेख हसीना(Sheikh Hasina) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत, केव्हाच देश सोडला आहे. त्यानंतर आता आंदोलकांसमोर बांगलादेशमधील सरसन्यायाधीश ओबैदुल हसन हे देखील हतबल झाले असून त्यांनीही राजीनामा दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT