Sheikh Hasina : ‘शॉर्ट नोटीस’वर आलेल्या शेख हसीना भारतातून कधी जाणार? मोदी सरकारने दिली अपडेट...

Bangladesh Crisis Modi Government : बांगलादेशात मोठा हिंसाचार उसळल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे.
Sheikh Hasina
Sheikh HasinaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतातच राहणार की अन्य देशात आश्रय घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. शॉर्ट नोटीसवर भारतात आलेल्या शेख हसीना काही तीन दिवसांपासून भारतातच आहेत. त्यांचा पुढचा प्लॅन कसा असेल, याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने अपडेट दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरूवारी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आधीच संसदेमध्ये याबाबत सांगितले आहे. शेख हसीना यांना शॉर्ट नोटीसवर भारतात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या माझ्याकडे त्यांच्या पुढील प्लॅनविषयी सांगण्यासारखे काही नाही. कारण क्षणाक्षणाला स्थिती बदलत आहे. जेव्हा स्थिती स्पष्ट होईल, तुम्हाला माहिती दिली जाईल.

Sheikh Hasina
Video Bajrang Sonwane : बजरंग सोनवणे यांची लोकसभेत बीडसाठी मोठी मागणी; सुप्रिया सुळे म्हणाल्या, व्हेरी गुड!

शेख हसीना यांनी तीन दिवसांपूर्वी बांगलादेशातून पलायन करत भारतात आश्रय घेतला आहे. त्या हिंडन विमानतळावर कडकोट सुरक्षाव्यवस्थेत असल्याचे सांगतिले जात आहे. मात्र, त्या किती दिवस भारतात राहणार, कोणत्या देशात आश्रयाला जाणार, याबाबत केंद्र सरकारकडेही माहिती नसल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले.

दरम्यान, बांगलादेशमध्ये लवकरच शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा असल्याचे सांगून जयस्वाल म्हणाले, बांगलादेशमध्ये जवळपास 19 हजार भारतीय होते, त्यापैकी 9 हजार विद्यार्थीही होते. बहुतेक विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. अनेक भारतीय परत येण्यासाठी मदत मागत आहे. त्यांच्या मदतीसाठी दुतावास सतत प्रयत्नशील असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

Sheikh Hasina
Waqf Board Act : वक्फ बोर्डात खासदार, गैर मुस्लिम, महिला..! संसदेत अडकले विधेयक, काय घडलं लोकसभेत?

बांगलादेशमधील भारतीयांच्या सुरक्षेसाठी तेथील अधिकाऱ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. तिथे लवकरच कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात यईल, अशी अपेक्षा आहे. बांगलादेशातील लोकांचे हित आमच्यासाठी सर्वोपरी आहे, असेही जयस्वाल म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com