Prakash Ambedkar Latest Marathi News Sarkarnama
देश

Prakash Ambedkar News : प्रश्न सुटत नसतील तर आमदार-खासदारांना मारा ; प्रकाश आंबेडकरांचा अजब सल्ला ; म्हणाले..

Prakash Ambedkar BARTY News : राज्यातील 861 विद्यार्थी मुंबईच्या आझाद मैदानावर दीड महिन्यापासून धरणे आंदोलन करीत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Prakash Ambedkar BARTY News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची (बार्टी) फेलोशिप मिळावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 861 विद्यार्थी मुंबईच्या आझाद मैदानावर दीड महिन्यापासून धरणे आंदोलन करीत आहेत. या विद्यार्थांच्या भेटीसाठी विविध नेत्यांनी त्यांची भेट घेतली.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आझाद मैदानात या विद्यार्थ्यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीच्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद

साधताना वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानामुळे काही आमदार-खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानावर समाज माध्यमांवर टीका होत आहे.

"ओबीसी समाजाचे आमदार, खासदार आपली बाजू सरकारसमोर ठेवतात. पण, अनुसूचित जातीचे आमदार, खासदार हे करत नाहीत. त्यामुळे तुमचा प्रश्न सुटत नसेल तर या आमदार खासदारांना मारा," असा अजब सल्ला आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

" हा मुद्दा आपण मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्याचे आंबेडकर म्हणाले.यावर मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे आश्वासन दिले होते. पण मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे त्यावर चर्चा होऊ शकली नाही असेही आंबेडकर म्हणाले.

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि शिष्टमंडळाचे प्रतिनीधी उपस्थित होते.

यावेळी ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य केली. त्याचे स्वागत करतानाच विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी मांडला.,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. बार्टी, सारथी, टीआरटीआय,महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT