Karnataka Elections : काँग्रेसच्या व्होट बॅँकेवर JDS ची नजर ; AIMIM सोबत युती ? ; कुमारस्वामी म्हणाले..

Karnataka Elections 2023 AIMIM : AIMIM ने युती करण्यासाठी तीन ते चार जागांची मागणी आमच्याकडे केली आहे.
Karnataka Elections 2023 AIMIM
Karnataka Elections 2023 AIMIM Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Elections 2023 AIMIM : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणुकीची तारीख जवळ येत असताना पक्षामध्ये'आयाराम-गयाराम' सुरु झाले आहे. या रणधुमाळीत जेडीएस आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआईएमआईएम)सोबत युती करण्याच्या विचारात आहे.

कर्नाटकात बहुमत कुठल्याही पक्षाला मिळाले तरी सत्तास्थापनेसाठी जेडीएसची महत्वाची भूमिका असते. काँग्रेसची हक्काची असलेले 'मुस्लिम व्होट बॅंक'वर आता जेडीएसची नजर आहे. जेडीएसचे नेता, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी. कुमारस्वामी म्हणाले की असदुद्दीन ओवैसी यांचा AIMIM पक्ष आणि अन्य पक्षासोबत युती करण्याबाबत चर्चा सुरु आहे. AIMIM ने युती करण्यासाठी तीन ते चार जागांची मागणी आमच्याकडे केली आहे.

Karnataka Elections 2023 AIMIM
Karnataka Elections 2023 : भाजपमध्ये खिंडार पडण्यास सुरवात ; तिकीट कापल्याने माजी उपमुख्यमंत्र्याचा राजीनामा

"AIMIM ला कुठल्या जागा द्यायच्या याबाबत सध्या आम्ही चर्चा करीत आहोत, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल,"असे कुमारस्वामी यांनी सांगितले. त्याआधी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष उस्मान गनी यांनी २५ जागांची मागणी केली आहे.

जेडीएस सर्व २२४ जागा लढविणार का, असा प्रश्न विचारल्यावर कुमारस्वामी म्हणाले, "जेडीएस सर्व जागा लढणारा नाही, काही जागांवर अन्य पक्षाशी युती करणार आहे. याबाबत बोलणी सुरु आहे,"

Karnataka Elections 2023 AIMIM
Karnataka Elections 2024 : शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करा, दोन लाख मिळवा ; JDS नेत्याचे अजब विधान ; काय आहे प्रकरण ?

कर्नाटक विधासभेसाठी भाजपने आपली पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या १८९ उमेदवारांच्या यादीत अनेक बड्या नेत्यांचे तिकीट कापले आहे. यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचाही समावेश आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी यांचेही तिकीट कापण्यात आले आहे. सवादी यांनी राजीनामा दिला आहे.

"मी भीकेचा कटोरा घेऊन फिरणारा नेता नाही, मी एक स्वाभीमानी नेता आहे. कुणाच्या राजकीय दडपणाखाली काम करणार नाही," अशा शब्दात सावदी यांनी पक्षश्रेष्ठींना सुनावलं आहे. निवडणूक तोंडावर आली असताना सावदी यांनी राजीनामा दिल्याने त्यांचा भाजपला मोठा फटका बसणार आहे. सावदी हे बंडखोरी करु शकतात, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

Karnataka Elections 2023 AIMIM
Karnataka Elections: माजी मुख्यमंत्र्याचे सातव्यांदा आमदार होण्याचे स्वप्न भंगणार की बंडखोरी करणार ? ; नड्डांच्या भेटीसाठी..

जगदीश शेट्टार यांना भाजपने 'निवडणूक लढू नका' असे सांगितले आहे. पण ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी आज (बुधवारी) त्यांना दिल्लीला बोलवलं आहे. शेट्टार हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. दुसऱ्याला संधी देण्यासाठी भाजपने शेट्टार यांचे तिकीट कापले आहे. शेट्टार हे नड्डांना भेटण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाले आहे. अजून ३४ नावांची यादी बाकी आहे.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com