Karnataka Assembly Election : माजी उपमुख्यमंत्र्याच्या विरोधात RSSचा पाठिंबा असलेले IAS अनिल कुमार रिंगणात..

Karnataka Election : त्यांच्यावर १३०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता
Karnataka Assembly Election
Karnataka Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत माजी सनदी अधिकारी (IAS) अनिल कुमार हे नशिब अजमावत आहेत. भाजपने त्यांची उमेदवारी (BJP Candidate list for Karnataka Elections)जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांनी जाहीर केलेल्या १८९ उमेदवारांच्या यादीत अनिल कुमार आहेत.

भाजपच्या पहिल्या यादीत ९ डाँक्टर, ३१ पदवीधर, ६ वकील दोन सनदी अधिकारी, तीन सेवानिवृत्ती अधिकारी, आठ महिलांचा समावेश आहे. अनिल कुमार यांच्यासह भास्कर राव हे दुसरे माजी सनदी अधिकारी निवडणूक रिंगणात आहे.

अनिल कुमार हे कर्नाटकच्या विधानसभा निवडणूक आखाड्यात उतरल्यामुळे सगळ्याचे लक्ष त्यांच्यावर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची अनिल कुमार यांनी नुकतीच भेट घेतली होती. तेव्हापासून ते चर्चेत आले. बेंगलुरु महापालिकेचे ते आयुक्त होते. त्यावेळी त्यांच्यावर १३०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता

चित्रदुर्ग गुरुपीठाचे प्रमुख श्री मदारा चन्नय्या स्वामीजी यांची मोहन भागवत यांनी भेट घेतली होती. तेव्हा अनिल कुमार उपस्थित होते, स्वामीजी आणि आरएसएसच्या पाठिंब्यावर ते निवडुकीच्या रिंगणात उतरणार हे तेव्हाच निश्चित झाले होते. त्यांनी काही दिवसापूर्वी आपल्या मतदारसंघात बैठकींना देखील प्रारंभ केला आहे. सेवानिवृत्त अनिल कुमार हे कोराटागेरे विधानसभा मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी परमेश्वर यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

Karnataka Assembly Election
Karnataka Elections : काँग्रेसच्या व्होट बॅँकेवर JDS ची नजर ; AIMIM सोबत युती ? ; कुमारस्वामी म्हणाले..

डॉ जी परमेश्वर म्हणाले, "अनिल कुमार हे अधिकारी असताना मी त्यांच्यासोबत काम केले आहे. ते आता भाजपकडून माझ्या विरोधात लढत आहेत. मी केलेल्या कामाची माहिती मतदारांना आहे. त्यामुळे मी पुन्हा निवडून येणार आहे,"

Karnataka Assembly Election
Karnataka Elections 2023 : भाजपमध्ये खिंडार पडण्यास सुरवात ; तिकीट कापल्याने माजी उपमुख्यमंत्र्याचा राजीनामा

राज्यमंत्री बी श्रीरामुलु बेल्लारी ग्रामीण येथून लढणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव सीटी रवी आपल्या चिकमगलूर येथून, आरोग्यमंत्री डाँ. सुधाकर चिक्काबालापूर येथून, तर मंत्री डाँ. अश्वथनारायण हे मल्लेश्वरम येथून निवडणूक लढत आहेत.

भाजपच्या पहिल्या यादीत ३२ ओबीसी उमेदवार, ३० अनुसूचित जाती (SC) उमेदवारा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर १६ अनुसूचित जनजातीचे (ST) उमेदवार आहेत. कर्नाटक सरकारचे मंत्री आर अशोक हे दोन जागांवर नशिब अजामवत आहेत. ते पद्दनाभनगर आणि कनकपुरा येथून लढत आहेत. कनकपुरा येथून ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके के शिवकुमार यांच्या विरोधात लढत आहेत.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com