Mallikarjun Kharge  sarkarnama
देश

Mallikarjun Kharge claims : ‘’बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेत तब्बल 455 कोटी गायब’’ ; मल्लिकार्जुन खर्गेंचा मोठा दावा!

Beti Bachao Beti Padhao : ...त्यामुळे मोदी सरकारचं खोटं पुन्हा एकदा उघड झालं आहे. असंही खर्गे यांनी म्हटलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Mallikarjun Kharge on Beti Bachao Beti Padhao scam : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी दावा केला की, माहिती अधिकार अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार समजले आहे की, सरकारची महत्त्वकांक्षी ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेत 455 कोटी रुपये गायब झाले आहेत. त्यांच्या या दाव्यावर सध्या तरी सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

खर्गे(Mallikarjun Kharge) यांनी एक्सवर पोस्ट केली आहे की, माहिती अधिकार कायद्यातून उघड झाले आहे की, मोदी सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेत 455 कोटी रुपयेगायब झाले आहेत. ‘‘बहुत हुआ नारी पर वार’’ वाल्या भाजपच्या जाहिरातींचा आवाज मागील दहा वर्षांपासून त्या सर्व महिलांच्या आक्रोशाची थट्टा करत आहे, ज्यांचा भाजपशासीत राज्यात किंवा कधीकधी भाजपच्या गुंडांकडून छळ झाला आहे.

त्यांनी दावा केला आहे की, अशातच पुण्यात सरकारी बसमध्ये एका महिलेवर असो किंवा मणिपूर व हाथरसमधील आमच्या मुली असतील, नाहीतर मग ऑलिम्पिक चॅम्पियन महिला खेळाडू असतील. भाजपच्या(BJP) राज्यात महिलांची सुरक्षा कुठंच दिसत नाही.

याशिवाय खर्गेंनी म्हटले की, आम्ही काही दिवसांपूर्वीच बेटी बचाओ संदर्भात मोदींना(PM Modi) तीन प्रश्न विचारले होते. ज्यापैकी एक प्रश्न आकडेवारी दडवण्याबाबतही होता. आज आरटीआय़च्या ताज्या माहितीनुसार मोदी सरकारचं खोटं पुन्हा एकदा उघड झालं आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT