White House meeting Trump Zelensky : युक्रेन आणि रशियामध्ये मागील दोन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचे जगावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे ते थांबवण्याची मागणी जगभरातील विविध देशांकडून केली जात आहे. अशातच युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांतील युद्ध थांबण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची शुक्रवारी (ता.28) व्हाईट हाऊसमध्ये चर्चा झाली.
मात्र व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या चर्चेचं रुपांतर वादात झाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातच जोरदार शाब्दिक चकमक झाली. या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
ज्यामध्ये ट्रम्प यांनी झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांना, तुमची भूमिका तडजोड करण्याचा नाही आणि तुम्ही रशियाविरोधात युद्ध जिंकू शकत नाही, असं स्पष्ट शब्दांत सुनावलल्याचं दिसत आहे. शिवाय मी जर मध्यस्थी केली नाही तर दोन्ही देशांत युद्धविराम होऊ शकणार नाही, असंही ट्रम्प यावेळी म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची युक्रेनने युद्ध रोखाव अशी इच्छा होती. यासाठी त्यांनी युक्रेनने (Ukraine) राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना अमेरिका दौऱ्यावर बोलावलं होतं. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या तडजोडीसाठी तयार नसल्याचं वक्तव्य केलं.
"पुतीन यांच्यासोबत शांतता चर्चेत तडजोड होऊ शकत नाही"; असं झेलेन्स्की यांनी म्हटल्यामुळे ट्रम्प चांगलेच संतापले. यावर ट्रम्प म्हणाले, "तुमची भूमिका तडजोड करण्याचा नाही. पण एक सांगतो तुम्ही रशियाविरोधात युद्ध जिंकू शकत नाही, मी जर मध्यस्ती केली नाही तर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम होऊ शकणार नाही.
जर तुमच्याकडे आमची लष्करी उपकरणे नसती तर हे युद्ध दोन आठवड्यात संपलं असतं." व्हाईट हाऊसमध्ये चर्चेदरम्यान युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूत ओक्साना मार्कारोवा आणि अमेरिकेचे (America) उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स देखील उपस्थित होते. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत झेलेन्स्की यांच्यावर आरोप केले.
ट्रम्प म्हणाले, "बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. पण झेलेन्स्की शांततेसाठी तयार नाहीत कारण त्यामध्ये अमेरिकंचा सहभाग आहे म्हणून. मात्र, आम्हाला कोणताही फायदा नकोय आम्हाला फक्त शांतता हवी आहे. शिवाय त्यांनी अमेरिकेचा अपमान केला अशून जर त्यांना शांतता हवी असेल तर ते परत येऊ शकतात."
दरम्यान, झेलेन्स्की यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, अमेरिकेच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद, अमेरिकन अध्यक्ष आणि अमेरिकन जनतेचे आभार. युक्रेनला फक्त आणि फक्त शांतता हवी आहे आणि आम्ही त्यासाठीच काम करत आहोत."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.