देश

Betting On Five states : पाच राज्यांवर सट्टाबाजाराचे आकडे; फेव्हरेट कोण? भाजप की काँग्रेस ?

Chetan Zadpe

Delhi News : पाच राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या, मतदान पार पडले, आता निकालाची सर्वांनाच उत्सुरता आहे. दरम्यान, निकालाबाबत विविध एक्झिट पोलच्या अंदाज जाहीर झाले. यानुसार काहींनी भाजपला पसंती दिली, तर काहींनी काँग्रेस येणार असल्याचे सांगितले. मात्र आता सत्ताबाजाराचा अंदाज सट्टाबाजारानेही लावले आहे. यानुसार त्यांनी भाजप अन् काँग्रेसवर सट्टाचा भाव लावले आहेत. (Latest Marathi News)

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. याचे एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत, तर दुसरीकडे सट्टाबाजाराचेही भाव समोर आले आहेत. सट्टाबाजाराच्या आकडेनुसार मध्य प्रदेशात भाजप ११७ ते ११९ जागा आणि काँग्रेस १०८ ते ११० जागा अंदाज सांगितला आहे. म्हणजे मध्य प्रदेशात भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचा अंदाज सट्टाबाजाराचा आहे.

तर दुसरीकडे राजस्थानमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं सरकार पडणार असल्याचा अंदाज सट्टाबाजाराचा आहे. राजस्थानमध्ये भाजपला १०८ ते ११० जागा आणि काँग्रेसला ७८ ते ८० जागा मिळणार असल्याचा अंदाज सट्टाबाजाराचा आहे. यामुळे आता सट्टाबाजारानुसार मध्य प्रदेशात आणि राजस्थानमध्ये भाजप फेव्हरेट आहे.

छत्तीसगडमध्ये मात्र सट्टाबाजाराचे आकडे काँग्रेसच्या बाजूने आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला ५१ ते ५३ जागा, तर भाजपला ३६ ते ३८ जागा सट्टाबाजाराने दिल्या आहेत. यामुळे इथे भाजपला सट्टाबाजाराने नाकारले आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेसला मोठे यश मिळणार असल्याचा अंदाज सट्टाबाजाराचा आहे. तेलंगणात काँग्रेस ६३ ते ६५ तर बीआरएस ४५ ते ४७ जागा मिळणार असल्याचा अदाज सट्टाबाजाराचा आहे. तर येथे भाजपला ५ ते ६ जागा मिळेल असाही अंदाज आहे.

या आकड्यांचा एकूणच सार काढायचा तर मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर आहे. राजस्थानमध्ये भाजप बाजी मारेल, असा अंदाज एक्झिट पोलचा आहे. मात्र इतर तीन राज्यात मात्र काँग्रेसच सत्तेचा झेंडा रोवणार, असे संकेत सट्टाबाजाराने दिला आहे. अर्थात मतदारराजाचा कौल आल्यावरच विजयाचा गुलाल कुणाला अन् पराभव कोणाचा? हे स्पष्ट होईल.

(Edieted By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT