Rajasthan Politics : मध्य प्रदेश, छत्तीसगडपेक्षा राजस्थानात काँग्रेसला मोठा विजय मिळेल : गेहलोतांचा विश्वास

Rajasthan Election : राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत आहे
Ashok Gehlot News
Ashok Gehlot NewsSarkarnama

Ashok Gehlot News : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकेल. मात्र, राजस्थानमध्ये 'अटीतटीची लढत' आहे. पण आम्ही जिंकू, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आम्ही मध्य प्रदेश आणि छत्तीसगडपेक्षा मोठा विजय मिळवू, असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री गेहलोत सोमवारी जोधपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडपेक्षा राज्यात काँग्रेस (Congress) पक्ष मोठा विजय मिळवेल, असे सांगितले. गेहलोत म्हणाले, राहुल गांधींनी त्यांना आवाहन दिले आहे आणि ते आम्ही स्वीकारतो, राजस्थान पक्षाच्या पुढे जाईल हे दाखवून देऊ.

Ashok Gehlot News
Sharad Pawar in Killari : भूकंपानंतर मदतीचा हात देणाऱ्या शरद पवारांबद्दल किल्लारीकर व्यक्त करणार कृतज्ञता...

राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर सीएम गेहलोत अॅक्शन मोडवर आले आहेत. राजस्थानमधील काँग्रेस सरकारने लोकांसाठी अनेक कामे केली आहेत. पक्षाला लोकांचा पाठिंबा आहे. काँग्रेस भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाविरुद्ध लढेल. गेहलोत येत्या 9 दिवसांत 18 जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. गेहलोत यांनी संजीवनी क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी घोटाळ्याचाही उल्लेख केला आणि अप्रत्यक्षपणे गजेंद्रसिंह शेखावत यांच्यावर निशाणा साधला. एका केंद्रीय मंत्र्याने या घोटाळ्यात अडकून गरीब ठेवीदारांची फसवणूक केली, असा हल्लाबोल त्यांनी केला.

गेहलोत राजस्थानमध्ये जिंकण्यासाठी पूर्ण तयारीत आहेत. गेहलोत यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस राजस्थानमध्ये विजयासाठी पूर्ण तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाने जोरदार रणनीती आखली असून, भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, भाजपनेही जोरदार ताकद पणाला लावली आहे. दोन्ही पक्षांमध्ये कडवी लढत आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Ashok Gehlot News
Santosh Bangar On MP Jadhav: खासदार जाधव स्वार्थी, त्यांनी लोकांचे रक्त पिण्याचेच काम केले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com