Bhagat Singh Koshyari : Anant Ambani 15 Crore Fund News Sarkarnama
देश

Bhagat Singh Koshyari : अनंत अंबानी यांच्याकडून घेतलेल्या 15 कोटी निधीचं काय केलं? कोश्यारी म्हणाले...

Anant Ambani 15 Crore Fund News : एक दिवस उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुलगे अनंत अंबानी माझ्याकडे आले. त्यांच्याशी मी चर्चा केली."

Chetan Zadpe

Uttarakhand News : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुलगे अनंत अंबानींकडून तब्बल 15 कोटी रुपयांच्या देणगी घेतल्याचा आरोप विरोधकांनी घेतला होता. यावर बरेच वादंग उठले होते. एका सामाजिक कामासाठी 15 कोटी रुपये घेऊन ते दुसरीकडे वळते केले, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. यावर आता खुद्द कोश्यारी यांनी माध्यमांपुढे येत सारे आरोप फेटाळून लावले आहे. (Latest Marathi News)

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, "मी महाराष्ट्राचा राज्यपाल होतो. त्यावेळी माझे शासकीय निवासाचे दरवाजे सामान्य माणसांपासून सर्वांनाच उघडे होते. सुरुवातीपासून मी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याची आवड बाळगतो. एक दिवस उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुलगे अनंत अंबानी माझ्याकडे आले. त्यांच्याशी मी चर्चा केली."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोश्यारी पुढे म्हणाले, "अनंत अंबानींना म्हणालो की, आमची एक अखिल भारतीय विद्या भारती शैक्षणिक संस्था आहे. ही संस्था देशभरात वीस हजार शाळांचे संचालन ही संस्था करते. याची एक संस्था नैनीतालमध्ये सरस्वती विहार नावाने कार्यरत आहे. त्याच्या अजूनही दोन-तीन शाखा आहेत. ही संस्था मागील चाळीस वर्षांपासून सुरु आहे. ही संस्था सगळ्या सरकारी कार्यालयात नोंदणी आहे. मी अनंत अंबानींना म्हटलं की, तुम्ही कॅार्पोरेट सोशल रिस्पॅान्सिबिलीटीमधून संस्थांना निधी देत असता. मग आमच्या शैक्षणिक संस्थेलाही निधी द्या. मग त्यांनी 15 करोड रुपयांचा निधी दिली." (Latest Marathi News)

"मी त्या शिक्षण संस्थेचा सदस्य आहे, शुभचिंतक आहे. मी त्या संस्थेला हा 15 कोटींचा निधी दिला आहे. अशा प्रकारे निधी कॅार्पोरेट सोशल रिस्पॅान्सिबिलीटीमधून घेतले जाते. असंही प्रत्येक आमदार खासदार प्रयत्न करतात की सीएसआरमधून उद्योजकांकडून पैसे मिळावेत. त्यांच्या क्षेत्रातील सामाजिक - शैक्षणिक कामासाठी असे पैसे घेतले जातात. यात काही चुकीचं काम नाही, असेही कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT