Nanded BJP News : अशोक चव्हाणांकडून प्रचार लोकसभेचा अन् तयारी मुलीला आमदार करण्याची...

Political News : भोकर मतदारसंघातील अर्धापूर येथे अशोक चव्हाण यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम पार पडला. या वेळी त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्या व्यासपीठावरील हजेरीने अनेकांचे लक्ष वेधले.
Ashok Chavan, shreejaya Chvan
Ashok Chavan, shreejaya Chvan Sarkarnama

Nanded News : भाजप खासदार अशोक चव्हाण नांदेड लोकसभेच्या प्रचाराला लागले आहेत. काँग्रेसमधील आपल्या समर्थकांना भाजपमध्ये आणण्याचे प्रवेश सोहळे करता करता ते प्रताप पाटील चिखलीकर यांना विजयी करण्याचे आवाहनही करत आहेत. दुसरीकडे त्यांचे लक्ष आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघावरही आहे. नुकताच भोकर मतदारसंघातील अर्धापूर येथे अशोक चव्हाण यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम पार पडला. या वेळी त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्या व्यासपीठावरील हजेरीने अनेकांचे लक्ष वेधले.

प्रचार लोकसभेचा अन् तयारी मुलीला आमदार करण्याची, अशी चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात होत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुका संपत नाही, तोच सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांनी लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीचीही फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. भोकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. (Nanded BJP News)

Ashok Chavan, shreejaya Chvan
Dr.Bhagwat Karad News : मी उमेदवार असो की नसो.., खैरे-इम्तियाज पुन्हा निवडून येणार नाहीत : डॉ. कराडांचे भाकित

राज्यसभेवर ते खासदार आहेत, मात्र भोकरमधून आपला नवा राजकीय वारसदार तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पत्नी अमिता चव्हाण यांनी एकदा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले होते. आता अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकारणात उतरतील असे दिसते. याची पूर्वतयारी लोकसभेच्या निमित्ताने अशोक चव्हाण यांनी सुरू केली आहे.

श्रीजया चव्हाण यांचा गेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आपले वडील अशोक चव्हाण यांच्यासोबत सक्रिय सहभाग होता. मतदारांनी संधी दिली तर आपल्याला राजकारणात यायला आवडेल, असे स्पष्ट करत श्रीजया यांनी इच्छाही व्यक्त केली होती, तर त्यांच्या इच्छेला वडील अशोक चव्हाण आता आपल्या ताकदीचे बळ देत आहेत. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने श्रीजया चव्हाण सक्रिय झाल्या आहेत. त्या अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक कार्यक्रमात दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा अर्धापुरात नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला श्रीजया चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Pratap Chikhlikar) यांनी श्रीजया चव्हाण यांचा तिसऱ्या पिढीतील नेतृत्व असा उल्लेख केला. भोकर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसची मजबूत पकड आहे. तसेच या मतदारसंघाचे नेतृत्व दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण, त्यानंतर अशोक चव्हाण, अमिता चव्हाण (Amita Chavan) यांनीही केले.

मतदारसंघातील ग्रामपंचायत, सेवा सहकारी सोसायटी, बाजार समितीवर काँग्रेसचा ताबा आहे. पण बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी अशोक चव्हाण हे श्रीजया चव्हाण यांचे नाव पुढे करू शकतात. तसेच बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पसंती श्रीजया चव्हाण यांच्या नावाला असल्याचे बोलले जाते. जिल्ह्याच्या राजकारणात श्रीजया यांना आणायचे असेल तर भोकर विधानसभा मतदारसंघ सुरक्षित मानला जातो. त्यादृष्टीने आतापासूनच अशोक चव्हाण यांनी तयारी सुरू केली आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Ashok Chavan, shreejaya Chvan
Ashok Chavan-Madhav Kinhalkar : कट्टर विरोधक अशोक चव्हाण - किन्हाळकर तब्बल 25 वर्षांनी एकाच व्यासपीठावर

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com