Punjab Political News : पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक असून त्याआधीच मुख्यमंत्री भगवंत मान यांना मोठा धक्का बसला आहे. मान यांचा काही महिन्यांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवरून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हातात दारूचा ग्लास असल्याचा त्यांचा व्हिडीओ खराच असल्याचे अकाल तख्तने स्पष्ट केले आहे.
NRI जगमान समरा यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये हातात दारूचा ग्लास घेऊन मुख्यमंत्री मान उभे असल्याचा दावा करण्यात आला होता. शीख गुरू आणि अन्य शीख धार्मिक गुरूंच्या फोटोंसमोर उभे राहून त्यावर ग्लासमधील दारू शिंपडतानाही व्हिडीओमध्ये दिसत होते. हा व्हि़डीओ एआय जनरेटेड असल्याचा दावा मान यांनी केला होता.
व्हिडीओची तपासणी करण्याची मागणी शिरोमणी अकाल दलाने केली होती. या प्रकरणी मुख्यमंत्री मान हे श्री अकाल तख्त साहिबसमोर उपस्थित राहिले होते. व्हिडीओ बनावट असल्याचे सांगत त्यांनी फॉरेन्सिक तपासणीचे आव्हान दिले होते. त्यानंतर सोमवारी जत्थेदार कुलदीप सिंह गडगज यांनी व्हायरल व्हिडीओ खराच असल्याचे समोर आल्याचे जाहीर केले.
जत्थेदार कुलदीप सिंह गडगज यांनी सांगितले की, व्हिडीओच्या फॉरेन्सिक लॅब तपासणीचा रिपोर्ट आल्यानंतर बैठक झाली. या बैठकीतील निर्णयानुसार आज भगवंत मान यांना गुरूद्रोही आणि खालसा पंथ विरोधी घोषित करण्यात आले. दरम्यान, आपचे प्रवक्ते बलतेज पन्नू यांनी व्हिडीओ खरा असला तरी त्यातील व्यक्ती कोण आहे, हे स्पष्ट होत नाही, असे सांगितले.
पन्नू यांनी म्हटले आहे की, व्हिडीओमधील व्यक्ती कोण आहे, याची माहिती रिपोर्टमध्ये नाही. रिपोर्टमध्ये ते स्पष्ट होत नाही. खरंतर जत्थेदार साहिब आता जे करत आहेत ते सुखबीर सिंग बादल यांच्या सांगण्यावरून करत आहे. आतापर्यंत बादल आणि शिरोमणी अकाली दलाने राज्यात पाचवेळा सरकार स्थापन केले. प्रत्येकवेळी त्यांनी धर्माच्या नावावर मते मागितली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.