Bharat Jodo Yatra sarkarnama
देश

Bharat Jodo Nayay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेला परवानगी नाकारली, बदलावे लागले ठिकाण

Roshan More

Manipur : भारत जोडो न्याय यात्रेचे सुरुवात मणिपूरमधील इंफाळमधून केली जाणार होती. मात्र, यात्रा सुरु करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना यात्रा सुरु करण्याचे ठिकाण काँग्रेसला बदलावे लागत आहे. प्रशासनाने परवानगी नाकारल्याने हा निर्णय काँग्रसकडून घेण्यात आला आहे. रविवारी (ता.14) या यात्रेची सुरुवात होणार आहे.

इंफाळपासून सुरू होणारी आता ही यात्रा इंफाळपासून 34 किमी दूर असलेल्या थौबल या ठिकाणाहून न्याय यात्रेस सुरुवात होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (mallikarjun kharge) यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. या यात्रेसाठी पोलिस प्रशासनाकडून एक हजार लोकांची परवानगी दिली होती. मात्र, या पेक्षा जास्त लोक यात्रेच्या प्रारंभा प्रसंगी येणार असल्याने काँग्रेसला इंफाळ पासून सुरु होणारी यात्रा थौबल येथून काढण्यात येणार आहे.

न्याया यात्रेला प्रशासनाकडून इंफाळ येथून परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेसकडून भाजपवर टीका करण्यात आली. भाजपच्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगत भाजप सरकार घाबरत आहे, असा टोला काँग्रेस नेत्यांनी लगावला. इंफाळ येथूनच काँग्रेसच्या न्याय यात्रेची सुरुवात होईल, असे काँग्रेस नेत्यांना वाटत होते. त्यासाठी पॅलेस ग्राऊंड सोडून अन्य काही जागांसाठी काँग्रेसकडून प्रशासनाकडे परवानगी मागितली जात होती. मात्र, अखेर काँग्रेसला यात्रा प्रारंभ करण्याचे स्थळच बदलावे लागले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

65 दिवसांची यात्रा

मणिपूरमधून यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर या यात्रेत राहुल गांधी 6,200 किलोमीटर एवढे अंतर पार करत मुंबईला पोहचणार आहे. मुंबईत या यात्रेचा समारोप होईल. 14 राज्यांमधून तसेच 85 जिल्ह्यांतून ही यात्रा जाणार आहे.मणिपूर, आसाम, मेघालय, नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातून ही यात्रा जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT