Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी दिल्लीत बैठक, मराठा महासंघ-जाट महापंचायतीची युती

Maratha Mahasangh : बैठकीला शेतकरी नेते राकेश टिकैत देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
Maratha Reservation
Maratha Reservationsarkarnama
Published on
Updated on

Delhi : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे-पाटील ठाम आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. मात्र, आता मराठा आरक्षणाचा मुद्द्याला राष्ट्रीय स्तरावर पाठींबा मिळतो आहे. आज (शनिवार) दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावर आरक्षणासाठी आंदोलन करण्याच्या दृष्टीने मराठा महासंघ, जाट महापंचायत आणि गुज्जर समाज यांची बैठक होत आहे. या बैठकीला शेतकरी नेते राकेश टिकैत देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे

Maratha Reservation
INDIA Alliance Meeting : इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; जागावाटपावर होणार निर्णय होणार?

मराठा आरक्षणाच्या मागणीला जाट महापंचायत, गुज्जर समाज यांचा पाठींबा आहे. दिल्लीमध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या जाट महासभेच्या संमेलनात मराठा महासंघाला आमंत्रित करण्यात आले होते. या संमेलनानंतर ओबीसीमधूनच समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी समिती स्थापन करण्याचे ठरले होते. त्यामध्ये आरक्षणाची ( Reservation) मागणी असलेल्या इतर समाजातील प्रतिनिधीनींचा समावेश करण्यात येणार होता.

मराठा महासंघ, जाट महापंचायत आणि गुज्जर समाजाच्या बैठकीत देशातील आरक्षणापासून वंचित असलेल्या छोट्या छोट्या समाजाला सोबत घेत आगामी काळात आंदोलन केले जाण्याबाबत रणनीती ठरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आरक्षण पासून वंचित असलेल्या घटकांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, ही या बैठकीत प्रमुख मागणी असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संघर्ष तीव्र होणार

मराठा महासंघ, जाट महापंचायत आणि गुज्जर समाज यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावे, हा प्रमुख अजेंडा बैठकीत असणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी देशभर आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्हे आहेत. ओबीसीतून आरक्षण देण्यास आधीच ओबीसी संघटनांमधून विरोध होत आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याचा शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com