Bharat Jodo Yatra News : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या दरम्यान सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना संसदेत पाहण्यास मिळाला. काही लोकप्रिय घोषणा केली की सत्ताधारी बाकं वाजवून मोदी-मोदीच्या (Narendra Modi) घोषणा देत होते. या घोषणांना विरोधकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.
सीतारामन या भाषणाला उभ्या राहिल्या तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सभागृहात आले. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी भारत जोडोच्या घोषणा दिल्या. त्यानंतर अमृत काळातला हा अर्थसंकल्प मी सादर करते आहे असे सीतारामन यांनी सांगितले. त्यानंतर काही लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या, तेव्हा सभागृहात सत्ताधारी सदस्यांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या.
त्यावेळी विरोधकांनीही भारत जोडो, भारत जोडो या घोषणा दिल्या. अर्थसंकल्पाच्या सुरूवातीलाच या घोषणांनी लोकसभेचे सभागृह दणाणून सोडले. त्यानंतर प्रत्येकवेळी जेव्हा सत्ताधाऱ्यांनी मोदी मोदी घोषणा दिल्या त्या विरोधात विरोधकांनी भारत जोडो, भारत जोडो या घोषणांनी उत्तर दिल्याचे पाह्यला मिळाले.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप ३० जानेवारीला झाला. भारत जोडो यात्रेने देशाला प्रेमाचा, आपुलकीचा मार्ग दाखवला आहे. काँग्रेसला (Congress) तिरस्कार संपवून देशात आपुलकी व प्रेम परत आणायचे आहे. लोकांलोकांमध्ये वाढलेली दुही संपवायची, असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
देशातील १२ राज्यांमधून ही यात्रा गेली. ७ सप्टेंबर २०२२ ला सुरू झालेली यात्रा ३० जानेवारी २०२३ ला संपली. या यात्रेचा प्रभाव देशभरात पडला असे राहुल गांधी यांनी सांगितले. त्याचे पडसाद आज संसदेतही उमलेट. राहुल गांधी येताच काँग्रेस सदस्यांनी भारत जोडोच्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.