Rahul Gandhi and Bharat Jodo Yatra Sarkarnama
देश

Bharat Jodo Yatra: राहुल गांधी पुन्हा 'भारत जोडो यात्रा' काढणार ? काँग्रेसने आखला मोठा 'प्लॅन'

Rahul Gandhi and Bharat Jodo Yatra 2.0: 'भारत जोडो यात्रे'च्या माध्यमातून राहुल गांधी पुन्हा रस्त्यावर उतरणार...

Ganesh Thombare

Delhi News: आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. भाजप एनडीएच्या माध्यमातून रणनीती आखत आहे, तर मोदी-शाहांना सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया' आघाडीची स्थापना करत भाजपला रोखण्यासाठी विरोधक प्लॅन आखत आहेत. अशातच आता काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा-2' सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा-2' ही डिसेंबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता असून, यासाठी काँग्रेसने मोठी तयारीही केल्याचे सांगण्यात येत आहे. ही यात्रा डिसेंबरमध्ये सुरू होऊ शकते, तर फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील, असेही सांगितले जाते. त्यामुळे 'भारत जोडो'च्या माध्यमातून राहुल गांधी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसची ही 'भारत जोडो यात्रा' हायब्रिड असण्याची शक्यता आहे, म्हणजे ही यात्रा कुठे पायी तर कुठे वाहनातून असणार आहे. यासाठीचे नियोजनही काँग्रेसकडून करण्यात येत आहे. सध्या देशातील पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू असल्याने या निवडणुका संपल्यानंतर राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी या आधी 7 सप्टेंबर 2022 ला कन्याकुमारीमधून भारत जोडो यात्रा सुरू केली होती, तर 30 जानेवारी 2023 ला जम्मू-काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रा संपवली होती. या संपूर्ण यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासह अनेक कार्यकर्ते तब्बल चार हजार किलोमीटरपेक्षा अधिक चालले होते. काँग्रेसच्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. राहुल गांधी आता पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा 2 च्या माध्यमातून चालणार आहेत.

Edited By - Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT