abg shipyard - CBI  Sarkarnama
देश

गुजराती व्यावसायिकाचा देशातील २८ बँकांना चुना; २२,८४२ कोटींचा सर्वात मोठा फ्रॉड

Bank Scam in Gujrat : विजय मल्यापेक्षा दिपपट मोठा घोटाळा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : गुजरातमध्ये देशाच्या बँकिंग इतिहासातील (Bank Fraud in Gujrat) सर्वात मोठा घोटाळा समोर आला आहे. ABG शिपयार्ड (abg shipyard) या जहाज बांधणी आणि दुरुस्ती करणाऱ्या कंपनीने स्टेट बँकेसह विविध २८ बँकांना तब्बल २२ हजार ८४२ कोटींचा चुना लावला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकिंग संघाकडून या फसवणूक संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे, अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. (Bank Fraud Case)

सीबीआयने या फसवणूक प्रकरणात ABG शिपयार्ड लिमिटेड कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल (Rushikesh Kamlesh Agrwal) आणि इतर संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या २८ बँकांनी ज्या उद्देशासाठी कर्ज पुरवठा केला होता, त्याऐवजी तो निधी अन्य कारणांसाठी वळवण्यात आला. (Bank Fraud Case) या निधीतून कंपनीच्या संचालकांवर विविध ठिकाणी अनेक मालमत्ता बनविल्या आणि खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, याची सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे.

बँकिंग संघटनांनी यापूर्वी २०१९ मध्ये सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर १२ मार्च २०२० रोजी सीबीआयने खुलासा मागवला होता. त्यानंतर बँक संघटनांनी त्याच वर्षी ऑगस्टमध्ये पुन्हा नव्याने तक्रार दाखल केली. आता दीड वर्षांपेक्षा अधिक काळ तपास केल्यानंतर सीबीआयने कारवाई केली आहे. सन २०१२-१७ या काळात आरोपींनी कट-कारस्थान रचून हे घोटाळे केल्याचं फॉरेन्सिक ऑडिटमधूनही समोर आले आहे.

दरम्यान, हे कर्ज वाटप करण्यामागे बँकेतील अनेक सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि खासगी लोकांची संदिग्ध भूमिका असल्याचा संशय सीबीआयला आहे. सीबीआयने नोंदवलेला हा आज पर्यंतचा सर्वात मोठा बँक फसवणूकीचा गुन्हा आहे. यापूर्वी विजय मल्याने ९ हजार कोटी तर निरव मोदी आणि मेहूल चोक्सी या जोडगोळीने १३ हजार कोटींना बँकाना चुना लावला आहे. आता गुजरातमध्येच २२ हजार ८४२ कोटी रुपयांना चुना लावल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT