खालापूर (जि. रायगड) : रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याविरोधात जिल्ह्यातील शिवसेनेच्या (shivsena) तीन आमदारांनी पालकमंत्री हटाव मोहीम उघडली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी ही नाराजी दाखवून देताना शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत एकत्र येण्याचे टाळले आहे. (Shiv Sena MLA aggressive to remove Aditi Tatkare from Guardian Minister! ncp are angry)
खालापूर नगरपंचायतीच्या सत्तास्थापनेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी मनोमिलन झाले असले तरी माजी आणि विद्यमान आमदारांमध्ये असलेला दुरावा मात्र प्रकर्षाने पुढे आला आहे. समोरासमोर येण्याचे दोन्ही दिग्गजांनी टाळले. यंदाची खालापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. शेतकरी कामगार पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरला होता, तर शिवसेनेने डावपेच आखत मोक्याच्या जागेवर राष्ट्रवादीबरोबर युती केली होती. परंतु शिवसेनेबरोबर झालेली युती ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांना रुचली नव्हती.
शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश लाड यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून अनेक मुद्द्यावर संघर्ष सुरू आहे. सुरेश लाड यांनी देखील निकालानंतर काय निर्णय घ्यायचा, हे पक्ष ठरवेल, असे सांगत शिवसेनेने गृहीत धरु नये, असा इशारा दिला होता. निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व कमालीचे वाढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ज्याला पाठिंबा त्याची सत्ता असे समीकरण झाले होते. सतरा नगरसेवकांची संख्या असलेल्या नगर पंचायतमध्ये आठ शिवसेना, सात शेकाप आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस असे संख्याबळ झाले. शिवसेनेसोबत जात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत बसली आहे. शिवसेनेचा नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात उपनगराध्यक्षपद पडले आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या सत्कारासाठी शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुरेश लाड यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपनगराध्यक्ष राजेश पारठे यांना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थिती दाखवली. राजेश पारठे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी प्रेमाखातर सुरेश लाड उपस्थित राहिले होते. राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना आशीर्वाद देत लाड नगरपंचायत कार्यालयामध्ये पाय न ठेवता तत्काळ निघून गेले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.