BJP  Sarkarnama
देश

BJP News : भाजपचा मोठा निर्णय : खासदार अन्‌ विधान परिषदेच्या आमदारांना उमेदवारी नाही

लोकसभा आणि विधान परिषदेत काही विधेयके मंजूर होत नाहीत. त्यामुळे एक एक जागा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे हायकमांडचे मत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे डझनहून अधिक खासदार आणि विधान परिषदेचे सदस्य विधानसभा निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली असली तरी भाजप हायकमांडने मात्रा त्याला होकार दर्शवलेला नाही. लोकसभा, राज्यसभा आणि विधान परिषदेचे सदस्य राजीनामा देऊन किंवा त्याशिवाय विधानसभा निवडणूक लढले आणि ते जिंकले तर ते आपल्या पदाचा राजीनामा देतील. (Big decision of BJP : No candidacy for MLAs of Vidhan Parishad and MPs)

मात्र यावेळी काही जणांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निवडणुकीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी भाजप हायकमांडने कोणालाही परवानगी दिलेली नाही. लोकसभा आणि विधान परिषदेत काही विधेयके मंजूर होत नाहीत. त्यामुळे एक एक जागा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे हायकमांडचे मत आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्यासाठी वर्षभरापासून पडद्याआडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कसरत करणाऱ्या इच्छुकांची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण २२४ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही लोकसभा, राज्यसभा व परिषदेच्या सदस्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

खासदार शिवकुमार उदासी, जी. एम. सिद्धेश्वर, पी. सी. मोहन, प्रताप सिंग, करडी संगण्णा, पी. सी. गद्दीगौडर, रमेश जिगजिनगी, डी. व्ही. सदानंद गौडा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शोभा करंदलाजे, ए. नारायणस्वामी, प्रदेश भाजप अध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी राष्ट्रीय राजकारणातून राज्याच्या राजकारणात येण्याचा मानस पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केला आहे.

भाजपमधील मोठ्या संख्येने खासदार विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असले तरी पक्ष हायकमांड त्याला परवानगी देण्यास तयार नाही. हायकमांडने सहमती दर्शवल्यास भाजपचे दहाहून अधिक खासदार विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. या खासदारांनी मागील विधानसभा निवडणूकही लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी खासदार असलेले मंत्री श्रीरामुलू यांना केवळ राजकीय कारणांसाठी परवानगी दिली होती.

यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा

प्रल्हाद जोशी, सदानंद गौडा, शिवकुमार उदासी, शोभा करंदलाजे, अनंतकुमार हेगडे यांनी मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेऊन राज्याच्या राजकारणात येण्यास मोठी उत्सुकता दाखविली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT