Agniveer scheme Sarkarnama
देश

Agniveer: अग्निवीरांसाठी मोठी बातमी! आता सैन्यात कायम स्वरुपाची नोकरी मिळणार; सरकारचा प्लॅन काय?

Agniveer: मोदी सरकारनं सुरु केलेली अग्नीवीर ही शॉर्ट सर्व्हिस स्कीम आता आणखी विस्तारीत होणार आहे. कारण या योजनेंतर्गत भरती होणाऱ्या अग्निवीरांना सैन्यामध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Amit Ujagare

Agniveer: मोदी सरकारनं सुरु केलेली अग्नीवीर ही शॉर्ट सर्व्हिस स्कीम आता आणखी विस्तारीत होणार आहे. कारण या योजनेंतर्गत भरती होणाऱ्या अग्निवीरांना सैन्यामध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी सरकारनं महत्वाचा प्लॅन आखला असून त्यानुसार या अग्निवीरांना आता कायम सेवा कार्यकाळासाठी विशिष्ट टक्क्यांची शिफारस केली जाणार आहे.

भारताच्या तिन्ही सैन्य दलांमध्ये (लष्कर, नौदल आणि हवाई दलांमध्ये) सध्या २५ टक्के अग्निवीरांना ४ वर्षाच्या सेवेनंतर कायम ठेवण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. अग्नीपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांना २०२३ च्या सुरुवातीला आपली ट्रेनिंग सुरु केली होती. अग्निवीरांच्या सुरुवातीच्या तुकड्यांनी यावर्षाच्या शेवटी सेवांसहित आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत.

सुरुवातीला हा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळं त्यांची सेवा समाप्त केली जाईल, त्यानंतर सैन्य दलांमध्ये पुढे काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि त्यानुसार निवड झालेल्या अग्निवीरांना मेरिटच्या आधारे नियमित सैन्य सेवेत पुन्हा भरती करुन घेतलं जाणार आहे. यासाठी नौदलाकडून या योजनेंतर्गत सहभागी होणाऱ्या नाविकांसाठी जास्त रिटेंशन परसेंटेज (७५ टक्के) देखील मागणार आहे. तर लष्कराकडून आणि हवाई दलाकडून सध्याच्या २५ टक्क्यांहून अधिक म्हणजेच सुमारे ५० टक्के अग्निवीरांना कायमस्वरुपी भरतीसाठी मागणी केली जाणार आहे.

२५ टक्के अग्निवीरांसाठी मंजुरी

सैन्य दलांनी आजवर हे सांगितलंय की, रिटेंशन परसेंटेज आजवर २५ टक्के राहिला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं १ जुलै रोजी लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडं विचारणा केली की, त्यांना सैन्यात अधिकच्या नियमित अग्निवीरांची गरज आहे. यामागची कारणं काय आहेत याची माहिती मात्र अद्याप मिळू शकलेली नाही. पण ट्रेंड आणि अनुभवी सैनिकांची गरज लक्षात घेता अधिकच्या अग्निवीरांना सामावून घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. ज्यांनी गेल्या चार वर्षात अनेक मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. तसंच नवीन टेक्नॉलॉजी आणि हत्यारं सांभाळण्याचा अनुभव त्यांना आहे. यावर सैन्य दल आणि डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स यांच्यामध्ये चर्चा होण्याची पुढे शक्यता आहे. कारण अनेक पर्याय उपलब्ध व्हावेत.

दरम्यान, गेल्यावर्षी लष्करात जवळपास ७०,००० अग्निवीरांनी प्रशिक्षण घेतलं होतं. पुढच्या वर्षी आता हा आकडा ९०,००० वर जाण्याची शक्यता आहे. पुढील दोन वर्षांत अग्निवीरांच्या रिक्त जागा हळू हळू वाढवत नेऊन सैन्य दलांमध्ये सुमारे १.८ लाख जवानांची कमतरता पूर्ण करण्याची शासनाची योजना आहे. गेल्या चार वर्षात अग्निवीरांसाठी विविध योजनांतर्गत बँकांसोबत करार करण्यात आले आहेत, इथंही त्यांनी भरती केली जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT