Engineering Colleges Closed : 58 इंजिनिअरिंग महाविद्यालयांवर टप्प्याटप्प्याने बंदी; महाराष्ट्रासह 'या' राज्यांवर परिणाम, विद्यार्थ्यांसाठी AICTEचा महत्त्वाचा निर्णय

AICTE Approves Progressive Closure of 58 Engineering Colleges Across India : शिक्षणाचा दर्जा, पायाभूत सुविधा आणि प्रवेशसंख्येतील सातत्याने होत असलेली घट या कारणांमुळे देशभरातील 58 अभियांत्रिकी महाविद्यालयांना 'प्रोग्रेसिव्ह क्लोजर'नुसार बंद करण्यात येणार आहे.
Engineering Colleges Closed
Engineering Colleges ClosedSarkarnama
Published on
Updated on

Engineering Colleges India : देशातील अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ने मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षणाचा दर्जा, पायाभूत सुविधा आणि प्रवेशसंख्येतील सातत्याने होत असलेली घट या कारणांमुळे देशभरातील 58 अभियांत्रिकी महाविद्यालयांना 'प्रोग्रेसिव्ह क्लोजर' (टप्प्याटप्प्याने बंद) करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार असून, शैक्षणिक क्षेत्रात याची मोठी चर्चा सुरू आहे.

AICTEच्या निर्णयानुसार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रत्येकी 12 अभियांत्रिकी महाविद्यालयांवर टप्प्याटप्प्याने बंदी लागू होणार आहे. त्यानंतर मध्य प्रदेशातील 8, तेलंगणा आणि पंजाबमधील प्रत्येकी 4, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी 3, गुजरात आणि कर्नाटकमधील प्रत्येकी 2, तर तामिळनाडू, हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका महाविद्यालयाचा समावेश या यादीत आहे.

महाविद्यालयांबरोबरच (Colleges) विविध संस्थांमधील 950 हून अधिक अभियांत्रिकी अभ्यासक्रम (कोर्सेस) देखील कायमस्वरूपी बंद करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध पर्यायांवर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली असली, तरी सध्या संबंधित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे AICTEने स्पष्ट केले आहे.

Engineering Colleges Closed
Latur NEET student suicide : NEET पेपरफुटीने घेतला आणखी एक जीव? लातूरमध्ये विद्यार्थिनीनं जीवन संपवलं, देशभरात संतापाची लाट

'प्रोग्रेसिव्ह क्लोजर'चा अर्थ महाविद्यालय तात्काळ बंद करणे नसून, पहिल्या वर्षाच्या नवीन प्रवेशांवर बंदी घालण्यात येते. आधीपासून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण त्याच संस्थेत पूर्ण करण्याची परवानगी राहील. तसेच, एखाद्या महाविद्यालयाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्यास विद्यार्थ्यांचे इतर मान्यताप्राप्त महाविद्यालयात स्थलांतर करण्याची व्यवस्थाही नियमांमध्ये उपलब्ध आहे.

Engineering Colleges Closed
PM Modi waits for NEET students : ‘नीट’ फेरपरीक्षेदिवशी पंतप्रधानांची मोठी कृती! नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांसाठी घेतला असा निर्णय की चर्चांना उधाण

सरकारी तीन काॅलेज बंद होणार

बंद होणाऱ्या 58 संस्थांपैकी बहुतांश खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. या यादीत सरकारी अनुदानित केवळ तीन संस्थांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. बंद होणाऱ्या या 58 संस्थांमध्ये खासगी महाविद्यालयांचा भरणा सर्वाधिक आहे, तर सरकारी अनुदानित असणाऱ्या फक्त तीन संस्था आहेत.

महाराष्ट्रसह ही काॅलेज बंद

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 12, मध्य प्रदेश आठ, तेलंगणा आणि पंजाबमधील प्रत्येकी 4, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमधील 3, गुजरात आणि कर्नाटकमधील दोन आणि तामिळनाडू, हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि पुणे परिसरातील प्रत्येकी एक इंजिनिरींग काॅलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कारणाने कारवाई

या महाविद्यालयांमध्ये गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी प्रवेशाची संख्या कमालीची घटली होती. अनेक जागा रिक्त होत्या. कॉलेजेस चालवणे आर्थिकदृष्ट्या कठीण झाले होते. याशिवाय, नियमानुसार आवश्यक असणारे पात्र आणि अनुभवी प्राध्यापक टिकवून ठेवण्यात प्रशासनाला अपयश येऊ लागले होते. तसेच, विद्यार्थ्यांसाठी गरजेच्या असणाऱ्या लॅब, लायब्ररी आणि इतर पायाभूत सुविधांच्या नियमांचे उल्लंघन सातत्याने केले जात होते, यातून ही इंजिनिअरींग काॅलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com