CM Arvind Kejriwal  Sarkarnama
देश

CM Arvind Kejriwal : मोठी बातमी ! दिल्लीत घडामोडींना वेग; केजरीवालांच्या निवासस्थानी अचानक पोलिस दाखल

Delhi Police : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक अचानक दाखल झाले. त्यामुळे दिल्लीत चर्चांना उधाण आलं आहे.

Ganesh Thombare

Delhi News: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक अचानक दाखल झाले. त्यामुळे दिल्लीत घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या 'हॉर्स ट्रेडिंग'च्या आरोप प्रकरणात क्राइम ब्रँचची टीम मुख्यमंत्री केजरीवाल यांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे. (CM Arvind Kejriwal )

केजरीवाल यांनी आरोप केला होता की, आम आदमी पक्षाच्या आमदारांना भाजप विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. 'आप'चे तब्बल 21 आमदार फोडण्याची भाजपची योजना असल्याचा गंभीर आरोप केजरीवालांनी केला होता. यानंतर 'आप'च्या नेत्या आणि मंत्री आतिशी यांनी देखील पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"भाजपकडून आम आदमी पक्षाच्या आमदारांना 25-25 कोटींची ऑफर येत आहे. एवढंच नाही तर सात आमदार फोडण्याचा प्रयत्न सुद्धा होत आहे. येत्या काळात आपण ऑडिओ क्लिप देखील रिलीज करणार आहोत", असं मंत्री आतिशी यांनी म्हटलं आहे.

केजरीवाल यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजपने जोरदार पलटवार केला. तसेच सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दिल्ली भाजपचे नेते सचिव हरीश खुराना यांनी 'आप'च्या नेत्यांना थेट चॅलेंज करत भाजपने संपर्क केलेल्या आमदारांची नावे जाहीर करा, असं म्हटलं आहे. दरम्यान, केजरीवालांच्या निवासस्थानी अचानक पोलिस दाखल झाल्यामुळे दिल्लीत चर्चांना उधाण आलं आहे.

अरविंद केजरीवाल यांना ईडीचे समन्स

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण प्रकरणात आत्तापर्यंत चारवेळा ईडीचे समन्स आले आहे. मात्र, केजरीवाल हे चौकशीसाठी हजर झाले नाहीत. यानंतर आज पुन्हा पाचव्यांदा ईडीचे समन्स आले. पण केजरीवाल हे आजही चौकशीला हजर झाले नाहीत.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील याच मद्य धोरण प्रकरणात अटक झाली होती. ते अद्याप तुरुंगात आहेत. तर केजरीवालांना अटक करून दिल्ली सरकार पाडण्याचा डाव भाजपचा असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात येत आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT