Manish Sisodia News : मनीष सिसोदिया यांना पाच दिवसांची 'सीबीआय' कोठडी

CBI Remand : राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने ४ मार्चपर्यंत सुनावली सीबीआय कोठडी
Manish Sisodia
Manish SisodiaSarkarnama
Published on
Updated on

AAP News : दिल्ली सरकारच्या नवीन अबकारी धोरणात झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सीबीआयने रविवारी (ता. २६) रात्री उशिरा अटक केली होती. त्यांना सोमवारी (ता. २७) दुपारी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांना पाच दिवसांची म्हणजे ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी आठ तास चौकशी केल्यानंतर रविवारी रात्री उशिरा मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांनी काही महिने तुरुंगात काढावे लागतील, अशी भीतीही व्यक्त केली होती. मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर 'आप'चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आक्रमक झाले आहेत.

Manish Sisodia
Kasba By Election : कसबा मतदारसंघात तब्बल 15 हजार मतदारांचे मतदार यादीत फोटोच नाहीत

केजरीवाल म्हणाले की, ''मनीष निर्दोष आहे. त्यांची अटक म्हणजे गलिच्छ राजकारण आहे. मनीष सिसोदिया यांच्या अटकेमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मात्र, प्रत्येकजण हे पाहत आहे. लोकांना सर्व समजतं असून लोक याला उत्तर देतील. पण यामुळे आमचे मनोबल आणखी वाढेल. आमचा संघर्ष आणखी मजबूत होईल."

Manish Sisodia
Koregaon : जिल्हा तहानलेला ठेऊन विद्वान खासदार पाणी माढ्याला नेताहेत : रामराजेंची टीका

सिसोदिया यांच्या अटकेनंतर आपचे (AAP) मुंबईतील आपचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. मुंबईत आम आदमी पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनादरम्यान 'आप'चे कार्यकर्ते आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. या आंदोलनावेळी पोलिसांमध्ये आणि 'आप' कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट देखील झाल्याचे पाहायला मिळाले.

Manish Sisodia
Thackeray vs Shinde Group : "आता प्रेमाचा 'व्हीप', दोन आठवड्यानंतर मात्र..."; शिवसेनेचा ठाकरे गटास इशारा

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना जाणूनबुजून अटक करण्यात आल्याचं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मुंबईतील आंदोलनादरम्यान काही 'आप'च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दिल्ली, मुंबईनंतर पुण्यातही 'आप'चे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com