MP Rajani Patil Sarkarnama
देश

MP Rajani Patil : मोठी बातमी! खासदार रजनी पाटील यांचं निलंबन; कारण काय?

Congress News : निलंबनानंतर काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

Congress MP Rajani Patil : काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांच्यावर निलंबनाची करणाई करण्यात आली आहे. सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा एक व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्यावर सभापती जगदीप धनखड यांनी ही कारवाई केली आहे.

ही निलंबनाची कारवाई उर्वरित अधिवेशनासाठी करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या विश्वासू खासदार म्हणून रजनी पाटील (Rajani Patil) यांना ओळखलं जातं. रजनी पाटील यांच्यावरील कारवाईमुळे काँग्रेसला धक्का बसला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सभागृहात भाषण केलं होतं. मात्र, याच दरम्यान, विरोधकांनी गोंधळ घातला होता. या गोंधळाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची करवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, सभागृहातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात यावं, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली होती. तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी त्यांच्या कृतीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

या कारवाईनंतर खासदार रजनी पाटील यांनी आपली भूमिका मांडली असून ''स्वातंत्र्यसैनिकांच्या घरातून मी येते. मला या अधिवेशनासाठी काय पूर्ण टर्म निलंबित करा. पण ज्या पद्धतीने भाजपने नाव घेऊन सभागृहात अपमान केला. तो सहन करणार नाही'', असं म्हणत त्या आक्रमक झाल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणी चौकशीशिवाय कोणावरही कारवाई करू नये, रजनी पाटील यांना दबावाखाली निलंबित करण्यात आले असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT