Congress News : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी काँग्रेस नेत्याला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

काँग्रेस नेते शिवकुमार यांची चौकशीच्या फेऱ्यातून काही दिवसांपुरती तरी सुटका झाली आहे.
Congress leader D. K. Shivkumar News
Congress leader D. K. Shivkumar News Sarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : उच्च न्यायालयाने (High Court) शुक्रवारी (ता. १० फेब्रुवारी) काँग्रेसचे (Congress) कर्नाटक (Karnataka) प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे शिवकुमार यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामावर लक्ष केंद्रीत करता येणार आहे. (Congress leader D. K. Shivkumar Relief from High Court in case of unaccounted assets)

डी. के. शिवकुमार यांची बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी केंद्रीय अन्वषेण विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाने शिवकुमार यांना २४ फेब्रुवारीपर्यंत दिलासा दिलेला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते शिवकुमार यांची चौकशीच्या फेऱ्यातून काही दिवसांपुरती तरी सुटका झाली आहे.

Congress leader D. K. Shivkumar News
Pandharpur News : सरकारच्या कोटींच्या घोषणा; मात्र शेतकऱ्यांना काही मिळत नाही : जयंत पाटलांचा हल्लाबोल

कर्नाटक उच्च न्यायालयाने सीबीआयच्या तपासावर ता. २४ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम स्थगिती जाहीर केली आहे. डी. के. शिवकुमार यांच्या बेहिशेबी मालमत्ता चौकशीच्या तपासाचा प्रगती अहवाल ता. २४ फेब्रुवारीपर्यंत सादर करा, तोपर्यंत सीबीआयने तपास सुरू ठेवू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे डी. के. शिवकुमार यांना काही दिवसांची उसंत मिळाली आहे.

Congress leader D. K. Shivkumar News
Shinde group News : शिंदे गटातील १६ आमदार अपात्रतेच्या वाटेवर : शिंदे-फडणवीस सरकारचे काही खरे नाही : बड्या नेत्याचे विधान

कर्नाटक उच्च न्यायालयाने सीबीआयच्या तपासावर ता. २४ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम स्थगिती जाहीर केली आहे. डी. के. शिवकुमार यांच्या बेहिशेबी मालमत्ता चौकशीच्या तपासाचा प्रगती अहवाल ता. २४ फेब्रुवारीपर्यंत सादर करा, तोपर्यंत सीबीआयने तपास सुरू ठेवू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे डी. के. शिवकुमार यांना काही दिवसांची उसंत मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com