सोलापूर : काँग्रेस (Congress) विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेल ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर पक्षाने पुन्हा मोठी जबाबदारी सोपवली आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कार्यपद्धतीवर कमालीचे नाराज असलेले थोरात हे नवी जबाबदारी स्वीकारून ती पार पाडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Balasaheb Thorat Congress star campaigner for Kasba Peth and Chinchwad by-elections)
सत्यजित तांबे यांनी नाशिकमधून अपक्ष म्हणून लढवलेली निवडणूक आणि त्याअनुंषगाने झालेले आरोप यामुळे बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देणे पसंत केले आहे. राजीनामा देताना थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे. नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या आरोपामुळे बाळासाहेब थोरात हे कमालीचे दुखावले आहेत. त्यापेक्षाही नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते प्रचंड नाराज झाले आहेत.
दरम्यान, पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडमधील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यात बाळासाहेब थोरात यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. सध्या थोरात हे मुंबईत असून त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे ते सध्या वैद्यकीय विश्रांती घेत आहेत, त्यामुळे थोरात हे कसबा पेठ आणि चिंचवडमधील प्रचाराच्या रणधुमाळीत उतरणार का?, हा खरा प्रश्न आहे.
काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेली स्टार प्रचारकांची यादी
महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, माजी मंत्री, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुनिल केदार, आमदार यशोमती ठाकूर, आमदार अमित देशमुख, आमदार सतेज पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार कुमार केतकर, खासदार इम्रान प्रतापगडी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा समावेश आहे. काँग्रेसचे हे स्टार प्रचारक दोन्ही मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करतील, असेही त्यात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.