Delhi News: लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे. एकाच वर्षात दोनदा खासदारकी रद्द झाल्यामुळे मोहम्मद फैजल यांना मोठा धक्का बसला आहे. फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे लक्षद्वीपचे खासदार आहेत.
खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या शिक्षेच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाला सहा आठवड्यांत पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले होते. तसेच जोपर्यंत उच्च न्यायालय निर्णय घेत नाही, तोपर्यंत त्यांची शिक्षा स्थगित राहील, असेही स्पष्ट केले होते.
आता केरळ उच्च न्यायालयाने खासदार मोहम्मद फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे फैजल यांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता मोहम्मद फैजल यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे.
दरम्यान, केरळ उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवल्यामुळे लोकसभा सचिवालयाने कारवाई करत त्यांना लोकसभेतून पुन्हा अपात्र करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या दोन गटांची निवडणूक आयोगामध्ये लढाई सुरू होण्याआधीच शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
खासदार मोहम्मद फैजल यांना 2009 मधील एका राजकीय खुनाच्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा झाली होती. ही शिक्षा आधी सत्र न्यायालयाने ठोठावली होती. त्यावर केरळ उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, नंतर या प्रकरणातील पीडितांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाला पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले होते.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.