ACB News : पिंपरीत 'एसीबी'ची मोठी कारवाई; 'महावितरण'चा क्लास वन अधिकारी लाचखोरीत अडकला

Mahavitaran Crime News : चिंचवड पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल
Bribe Case
Bribe Casesarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : गेल्या काही दिवसांत पुणे एसीबी ही पुणे ग्रामीण म्हणजे जिल्ह्यातील लाचखोरांना पकडत होती. आता त्यांनी आपला मोर्चा पुन्हा शहराकडे वळवला आहे. बुधवारी त्यांनी दहा हजार रुपयांची लाच आपल्याच ठेकेदाराकडे मागणारा कार्यकारी अभियंता राजेंद्रकुमार साळुंखे या क्लास वन अधिकाऱ्याला आपल्या कारवाईचा इंगा दाखवला.

पुणे एसीबीने बुधवारी बरोबर आठ दिवसांपूर्वी कोरोना काळातील सॅनिटायझरचे आणि गॅस शवदाहिनीचे बिल मंजूर करण्यासाठी एक टक्का लाच मागणारा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा (ता. मावळ) अकाउंटट नरेंद्र अनंतराव कणसे (वय 55) याला दणका दिला होता. त्यानेही नगपरिषदेच्या ठेकेदाराकडेच बिलाच्या एक टक्का लाच मागितली होती.(Bribe Case)

Bribe Case
ED Action On Sanjay Singh : 'मरना मंजूर है, झुकना मंजूर नहीं...'; ईडीकडून अटक झाल्यानंतर संजय सिंहांची प्रतिक्रिया

त्याच महिन्यात १३ तारखेला पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर (ता. खेड) नगरपरिषदेतील लाचखोरी तेथील एका २९ वर्षीय तरुण ठेकेदारामुळे उघडकीस आली होती. तेथे तर बिलाच्या दहा टक्के लाच मागून ती घेण्यातही आली होती. त्यातही नगरपरिषदेचा अकाउंटट प्रवीण गणपत कापसे (वय ३५) आरोपी आहे. तो आणि सीईओ श्रीकांत अण्णासाहेब लाळगे (वय ३५) यांच्यातर्फे आरोग्य विभागाच्या महिला इंजिनिअरने आठ हजार रुपयांची लाच घेतली होती.(Pimpri Chinchwad Crime News)

तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील त्यातही पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीतील लाचखोरीवर एका तरुण शीख ठेकेदारामुळेच शिक्कामोर्तब दोन वर्षांपूर्वीच झाले होते. एकूणच ठेकेदारांची नवी पिढी अधिक सजग आणि जागरूक झाल्याचे दिसून येत आहे.

आजच्या ताज्या लाचखोरीच्या घटनेत ग्राहकाच्या घरी बसवलेल्या सोलर सिस्टिमची एनओसी देण्याकरिता आणि मीटरच्या टेस्टिंगसाठी साळुंखेने आपल्या तरुण ठेकेदाराकडे दहा हजारांची लाच मागितली. मात्र, त्यांनी ती न देता एसीबीकडे तक्रार दिली. त्यावरून त्यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला.

दरम्यान, साळुंखेने स्वतःसह कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही ही लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तेही आता गोत्यात येणार आहेत. एकूणच त्यामुळे महावितरणच्या चिंचवड कार्यालयातील भ्रष्टाचारही त्यातून समोर येणार आहे. एसीबीचे (ACB)डीवायएसपी सुदाम पाचोरकर याबाबत पुढील तपास करत आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Bribe Case
Bachchu Kadu News : " अनिल बोंडेंसारखे १० खासदार पाठवले तरी..." ; आमदार कडूंचं भाजपलाच ओपन 'चॅलेंज'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com