Pankaja Munde News : कारखान्याला मदत टाळली अन् जीएसटीने कारवाई केली; पण पंकजा मुंडेंनाच मिळतोय बूस्ट

Maharashtra politics : जेव्हा जेव्हा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे अडचणीत आले, त्यावेळी त्यांच्या मागे समर्थक ताकदीने एकवटले.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Politics : जेव्हा जेव्हा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे अडचणीत आले, त्यावेळी त्यांच्या मागे समर्थक ताकदीने एकवटले. आताही त्यांच्या कन्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अडचणीत असल्याचे दिसताच समर्थक ताकदीने मागे उभारले आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला लाखोंच्या आर्थिक मदतीपेक्षा त्यांच्या मागे उभारलेली समर्थकांची ताकदीची दखल घ्यावी लागेल.

मागील १० वर्षांचा विचार केला, तर २०१२ मध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकतर्फी वातावरण होते. जिल्हा परिषद निवडणुक तोंडावर असतानाच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी समाज व समर्थक ताकदीने दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाठीशी उभारले. राष्ट्रवादीकडे एकतर्फी असलेले वातावरण त्यावेळी फिरले आणि मुंडेंच्या मागे ताकद उभा राहिली.

Pankaja Munde News
MNS News : 'मराठी पाट्यां'च्या यशानंतर आता मराठी गाण्यांसाठी मनसे आक्रमक !

दिवंगत मुंडेंच्यानंतर पंकजा मुंडे यांनी राज्यात काढलेल्या संघर्षयात्रेला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडेंच्या भाषणाला नकार मिळाल्यानंतर त्यांनी संत भगवानबाबांचे जन्मगाव सावरगाव घाटला मेळावा घेतला आणि त्यालाही तेवढाच प्रतिसाद मिळाला. गडाची स्थापना करून या ठिकाणी दरवर्षी मोठा मेळावा होत आहे.

दरम्यान, अलीकडे पंकजा मुंडे यांना भाजपकडून (BJP) डावलले जात असल्याचे चित्र असून, तसा थेट आरोप समर्थकांकडून होत आहे. अलीकडे राज्यातील अडचणीतल्या सहकारी साखर कारखान्यांना गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या केंद्रीय सहकार खात्याकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत झाली. मात्र, या मदतीसाठी प्रस्ताव असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत मिळाली नाही. उलट जीएसटी आयुक्तालयाने जीएसटीच्या थकीत १९ कोटी रुपयांसाठी वैद्यनाथ कारखान्यावर जप्तीची कारवाई सुरू केली. यामुळे समर्थकांतून संतापाची लाट उसळली.

जीएसटीने नोटीस दिली असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले खरे, पण त्यावरही नोटीस नसून कारवाई असल्याचे खुद्द पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी निक्षून सांगितले. कारखान्याला मदत टाळल्याचेही त्यांनी अनेकदा जाहीर सांगितले. त्यामुळे पंकजा मुंडे अडचणीत आल्याची समर्थकांची भावना झाली आणि त्यांच्यामागे एकजुटीने ताकद उभारल्याचे चित्र आहे. कारखान्याकडील जीएसटीची रक्कम आम्ही मुंडे भक्त वर्गणीतून जमा करून थोबाडावर मारू, असे सांगून मदत गोळा होत आहे. परंतु, या आर्थिक मदतीपेक्षा मुंडेंच्या मागे उभारत असलेली ताकद लक्षणीय आहे.

मदतीच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांच्या बाजूने तयार झालेली जनभावना पक्षाला विचार करायला लावणारी आहे. कारखान्याला मदत टाळणे आणि कारखान्यावर जप्तीची कारवाई पंकजा मुंडे यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी सुरू असलेला खाटाटोप असल्याची भावना सोशल मीडियावर थेटपणे समोर येत आहे. कोणी एक लाख रुपये, तर कोणी ५० लाख रुपये देऊ करत आहे. तर कोणी वडिलोपार्जित जमीन विकून मदत करण्याची भावना व्यक्त करत आहे. या भावनेच्या निमित्ताने अडचणीतल्या पंकजा मुंडे यांच्या मागे पुन्हा एकदा समाज ताकदीने उभा राहत आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Pankaja Munde News
ED Action On Sanjay Singh : मोठी बातमी ! दिल्लीतील मद्य घोटाळ्यात खासदार संजय सिंहांना ईडीकडून अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com