Sharad Pawar-Ajit Pawar Sarkarnama
देश

Ajit Pawar NCP News : ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा दिलासा; पण, अजितदादांना 'हा' मजकूर लिहावा लागणार

Maharashtra Assembly Election 2024: आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांना घड्याळ चिन्ह वापरता येणार आहे. मात्र, अजित पवार यांना प्रत्येक ठिकाणी 'हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे' असा मजकूर लिहावा लागणार आहे.

Sachin Waghmare

New delhi News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांना घड्याळ चिन्ह वापरता येणार आहे. मात्र, अजित पवार यांना प्रत्येक ठिकाणी 'हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे' असा मजकूर लिहावा लागणार आहे.

त्यासोबतच अजित पवार यांना शरद पवार यांनी दाखल केलेल्या अर्जावर आणि कोर्टाच्या निर्देशावर प्रतिज्ञा पत्र द्यावे लागणार आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात 6 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि चिन्ह प्रकरण हे फेब्रुवारी २०२४ पासून सुप्रीम कोर्टात प्रलंबीत आहे. ज्यावेळेस निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. त्यावेळी शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

त्यानंतर काही महिन्यांनी नोटिस देण्यात आली, त्यानंतर त्या नोटिसला अजित पवार गटाने उत्तर देखील दिले. तो मुख्य विषय अद्याप कोर्टात प्रलबित आहे. लोकांमध्ये चिन्हाबाबत संभ्रम आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना सुद्धा दुसरे चिन्ह देण्यात यावे, असा अर्ज शरद पवार गटाने मागील महिन्यात केला होता.

अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून घड्याळ चिन्हावर 'प्रकरण न्यायप्रविष्ट' असा उल्लेख होत नसल्याने गुरुवारी शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटांना खडसावत आम्ही दिलेला सूचनांचे पालन करा, अन्यथा आम्ही स्वतःहून अवमान ठपका ठेवू असा इशारा दिला. अजित पवार गटाने सर्व सूचनांचे पालन करत असल्याचे सांगत प्रतिज्ञापत्र आणि पुरावे सादर करू असे आश्वासन दिले आहे.

शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद केला.

यावेळी बोलताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, घड्याळ हे चिन्ह दोघांपैकी कोणालाही मिळू नये अशी आमची मागणी होती. मात्र, तुम्ही 19 मार्च रोजी हे चिन्ह बहाल करताना काही अटी घातल्या होत्या. मात्र, त्या अटींचे पालन अजित पवार गटाकडून झालेलं नाही याकडे सिंघवी यांनी लक्ष वेधले. जे चिन्ह कोर्टाच्या विचाराधीन आहे तेव्हा त्याचा फायदा दोघांपैकी एकाला व्हायला नको, हे चिन्ह पक्ष फुटीपूर्वीचे असल्याचे अभिषेक सिंघवी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT