Mumbai News : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी राज्यात सध्या जोरात सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी महायुती आणि महाविकासआघडीमध्ये सध्या जोरबैठका सुरु आहेत.
राज्यातील अनेक जागांची लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची जाहली आहे. त्यातच आता महायुतीमधील घटक पक्षाने काही मतदारसंघात अदलाबदल करण्याऐवजी या वेळेसपासून जागा असलेल्या पक्षातच त्या पक्षातील इच्छुक असलेल्या उमेदवारांना रिंगणात उतरवण्याची रणनीती आखली आहे.
राज्यातील जवळपास चार मतदारसंघात अशा प्रकारचे बदल महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षाने एकमेकांकडे तगडे असलेले उमेदवार पाठवले आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या लढती चुरशीच्या ठरणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.
कोकणातील कणकवली मतदारसंघात भाजपचे (Bjp) माजी खासदार नीलेश राणे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला होती. त्यामुळे अडचणीच्या ठरणाऱ्या या जागेवर भाजपने निलेश राणे यांना शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी घेण्यास सांगितले. त्यानंतर राणे यांनी शिवसेना प्रवेश केला.
त्यासोबतच विदर्भातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले इच्छुक होते. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाट्याला असल्याने याठिकाणी उमेदवारी मिळवण्यासाठी बडोले यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांनंतर त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याठिकाणचे आमदार चंद्रिकापुरे यांना उमेदवारी देण्यात अली नाही.
सांगली जिल्ह्यातील तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. या ठिकाणी भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
तसेच आता तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेच्या रिंगणात स्वतः संजयकाका उतरणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात महायुतीकडून एक तगडं आव्हान उभं केलं जातंय. त्यामुळे राज्यातील अशा लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.