Political activity intensifies in Bihar as discussions grow around BJP MLA Lakhendra Kumar Raushan possibly replacing Nitish Kumar as Chief Minister. Sarkarnama
देश

Bihar CM news : बिहारमध्ये घडामोडींना वेग, मोदी-शाह देणार भल्याभल्यांना धक्का; CM पदासाठी भात्यातून काढला बाण, नितीश कुमारांचेही शिक्कामोर्तब?

Lakhendra Kumar Raushan : लखेंद्र पासवान यांनी शनिवारी नितीश कुमार यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे. नितीश कुमार यांचीही पासवान यांच्या नावाला संमती असल्याची चर्चा आहे.

Rajanand More

BJP Bihar leadership : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतीच राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे ते लवकरच CM पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्याआधी भाजप आणि संयुक्त जनता दलाकडूनही मुख्यमंत्रिपदासह नव्य मंत्रिमंडळाच्या निवडीसाठी चर्चांना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. पण बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपद सोडून राज्यसभेत जाणे पसंत केले आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपद भाजपकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याजागी भाजप कुणाला संधी देणार, याची जोरदार चर्चा आहे. काही राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नेत्याची निवड करताना मोदी-शहांना बड्या नेत्यांना धक्का देत नवा चेहरा समोर आणला होता. आता बिहारमध्येही तीच चर्चा सुरू झाली आहे.

नवे नाव आले समोरे

बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठी सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांच्या नावांची चर्चा सुरू असतानाच आता लखेंद्र कुमार रौशन हे नाव समोर आले आहे. ते वैशाली जिल्ह्यातील आमदार असून ही त्यांची दूसरी टर्म आहे. सध्या ते नितीश कुमार सरकारमध्ये अनुसूचित जाती-जमाती कल्याण खात्याचे मंत्री आहेत. ४७ वर्षी रौशन यांना लखेंद्र पासवान म्हणून ओळखले आहे.

पासवान यांनी शनिवारी नितीश कुमार यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे. नितीश कुमार यांचीही पासवान यांच्या नावाला संमती असल्याची चर्चा आहे. भाजपची सध्या ज्येष्ठ नेत्यांऐवजी नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपकडून नवी फळी तयार केली जात आहे. यापार्श्वभूमीवर पासवान यांच्याकडेही पाहिले जात आहे.

पासवान हे मागासप्रवर्गातील असल्याने बिहारच्या राजकारणात त्यांच्या निवडीला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असेही तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, पासवान यांनी मीडियाशी बोलताना या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी त्यावर थेट बोलणेही टाळले. एनडीएचे मजूबत सरकार सत्तेत येईल, एवढेच ते म्हणाले. एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी नितीश कुमार यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT