Manish Kashyap parts ways with BJP ahead of the 2025 Bihar elections, triggering political discussion and speculation.  Sarkarnama
देश

Bihar Election : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला 5 दिवसांत दुसरा मोठा झटका; लोकप्रिय नेत्यानं ठोकला रामराम

Who is Manish Kashyap and Why His Exit Matters : मनीष कश्यप हे फारकाळ भाजपमध्ये टिकले नाही. त्यांनी 25 एप्रिल 2024 रोजी दिल्लीत जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 13 महिन्यांतच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना त्यांनी पक्षाला धक्का दिला आहे.

Rajanand More

BJP's Bihar Campaign : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला पाच दिवसांत दुसरा मोठा झटका बसला आहे. बिहारमधील लोकप्रिय यू-ट्यूबर मनीष कश्यप यांनी भाजपची साथ सोडली आहे. फेसबूक लाईव्ह करत त्यांनी भाजपमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. मागील आठवड्यातच एका भाजप नेत्याने पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मनीष कश्यप हे फार काळ भाजपमध्ये टिकले नाही. त्यांनी 25 एप्रिल 2024 रोजी दिल्लीत जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 13 महिन्यांतच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना त्यांनी पक्षाला धक्का दिला आहे. कश्यप हे सातत्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करत होते. पण अचानक त्यांनी हा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मागील आठवड्यात भाजपचे प्रवक्ते असित नाथ तिवारी यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

पडद्यामागे काय घडलं?

पटना मेडिकल कॉलेजमध्ये कनिष्ठ डॉक्टर आणि कश्यप यांच्यामध्ये वाद झाला होता. आपल्याला डॉक्टरांनी मारहाण केल्याचा दावा कश्यप यांनी केला होता. या वादात भाजपच्या कोणत्या बड्या नेत्याने हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे ते एकटे पडले. यावरून त्यांनी आरोग्यमंत्री मंगल पाड्ये यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांना रडू कोसळले होते.

भाजपमध्ये जाणे आपली चूक होती, असे त्यावेळीच कश्यप म्हणाले होते. त्यामुळे ते भाजपमधून बाहेर पडणार अशी चर्चा सुरू असतानाच शनिवारी रात्री त्यांनी फेसबूकवरून याबाबत घोषणा केली. मी पक्षासाठी तन-मन-धनाने काम केले. पण पक्षाने माजी अब्रूही वाचवली नाही. मी स्वत:ला वाचवू शकत नाही, तर बिहारच्या लोकांची काय मदत करणार?, असा सवाल त्यांनी केला.

निवडणूक लढणार

मनीष कश्यप यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचेही संकेत दिले आहेत. मात्र, कोणत्या पक्षात जाणार की अपक्ष म्हणून मैदानात उतरणार याबाबत त्यांनी स्पष्ट केले नाही. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण आपले म्हणणे मांडू. मी कुठून, कोणत्या पक्षातून की अपक्ष निवडणूक लढवावी, हे तुम्हीच सांगा, असे कश्यप म्हणाले आहेत. दरम्यान, कश्यप यांचे यू-ट्यूब, फेसबूक, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट्सवर लाखो फॉलोवर्स आहेत. त्यापैकी अनेकांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT