Maharashtra Election Controversy : महाराष्ट्राच्या निकालावर उत्तर देणाऱ्या निवडणूक आयोगाला राहुल गांधींनी डिवचले; म्हणाले,'दिशाभूल करणाऱ्या ...'

Rahul Gandhi Election Commission : राहुल गांधी यांनी लेख लिहून घेतलेल्या आक्षेपांना देवेंद्र फडणवीस यांनी देखील लेख लिहून उत्तर दिले आहे.
Election Commission, Rahul Gandhi
Election Commission, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi News : राहुल गांधी यांनी वर्तमान पत्रांमध्ये लेख लिहून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर आक्षेप नोंदवला होता. बनावट मतदार याद्या आणि बोगस मतदानाद्वारे ही निवडणूक भाजपने जिंकल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. तसेच निवडणूक आयोगाला देखील टार्गेट केले होते. आयोगाने यावर उत्तर देताना काँग्रेस तसेच काँग्रेसच्या अधिकृत एजंट्सनी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रिटर्निंग ऑफिसर तसेच निवडणूक निरक्षकांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नव्हती, असे म्हटले होते.

निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तरानंतर राहुल गांधींनी ट्विट करत म्हटले आहे की, 'प्रिय निवडणूक आयोग आपण एक घटनात्मक संस्था आहात. गंभीर प्रश्नांवर उत्तर देण्याचा मार्ग म्हणजे मध्यस्थांमार्फत निनावी व दिशाभूल करणाऱ्या टिपण्या प्रसिद्ध करणे नव्हे. आपल्याकडे लपवण्यासारखे काहीच नसेल, तर माझ्या लेखातील प्रश्नांची थेट उत्तरे द्या आणि कृती करून ते सिद्ध करा'

राहुल यांनी निवडणूक आयोगाला आवाहन करत म्हटले आहे की, 'तुमच्याकडे लपण्यासारखे काही नाही तर महाराष्ट्रासह सर्व राज्यांतील लोकसभा व विधानसभेच्या अलीकडील निवडणुकांसाठीचे एकत्रित, डिजिटल व मशीन-रीडेबल मतदार याद्या प्रकाशित करा. तसेच महाराष्ट्रातील सर्व मतदान केंद्रांतील संध्याकाळी ५ वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा, टाळाटाळ केल्याने आपली विश्वासार्हता टिकणार नाही. सत्य सांगितल्यानेच ती टिकेल.'

Election Commission, Rahul Gandhi
Pune Congress : काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर! माजी आमदारासह सहा माजी नगरसेवक सोडणार साथ?

देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

राहुल गांधी यांनी लेख लिहून घेतलेल्या आक्षेपांना देवेंद्र फडणवीस यांनी देखील लेख लिहून उत्तर दिले आहे. 2009 च्या निवडणुकीत देखील लोकसभेनंतर विधानसभेत मतदारांची संख्या वाढली होती. तेव्हा काँग्रेस सत्तेत आली होती. असे फडणवीसांनी म्हटले आहे. तसेच माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, लेखाचे उत्तर लेखाने दिले आहे. फॅट्स आणि फिगर दिले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचे बोलणं सोडतील.

Election Commission, Rahul Gandhi
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजपमध्येच वादळ, नाशिकच्या तिन्ही आमदारांमध्ये अस्वस्थता

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com