Bihar CM Nitish Kumar announces a major pension hike Sarkarnama
देश

Bihar Election 2025: बिहारमध्ये पुन्हा नितीशराजच! मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची तारीखही ठरली

Bihar Election 2025: भाजपपेक्षा कमी जागा मिळवूनही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची नितीश कुमार यांना देण्यामागे भाजपची नेमकी काय रणनीती आहे?

Amit Ujagare

Bihar Election 2025: बिहारमध्ये भाजप-जेडीयूसह इतर मित्रपक्षांच्या एनडीएला घवघवीत यश मिळालं. यामध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला पण जेडीयू भाजपपासून केवळ चार जागांपासून पिछाडीवर राहिला. तरीही बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ ही नितीश कुमार यांच्याच गळ्यात पडणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शपथविधीची तारीखही निश्चित झाली आहे. भव्य स्वरुपात हा शपथविधीसोहळा होणार आहे. त्याचबरोबर दोन उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष कोण असेल याच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे.

नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची सलग १० व्यांदा तर बिहारचे २३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. २० नोव्हेंबर २०२५ रोजी पाटण्यातील गांधी मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. सुमारे १ लाख लोक या सोहळ्याला उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी विधानसभेचं अध्यक्षपद हे भाजप आपल्याकडं ठेवणार आहे. तर भाजपच्या कोट्यातून दोन उपमुख्यमंत्री असतील असंही सांगितलं जात आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गाळ्यात?

दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुन्हा एकदा सम्राट चौधरी यांचं नाव पुढे आहे. त्यांना विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरा उपमुख्यमंत्री म्हणून अगडी जातीतून येणारे नितीश मिश्रा, नितीन नबीन आणि मंगल पांडे यांच्या चेहऱ्याची चर्चा आहे. जातीय समीकरणांच्या नुसार ही नावं प्रबळ दावेदार मानली जात आहेत. सुशील मोदी यांच्यानंतर सातत्यानं उपमुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात टाकण्यासारखा अद्याप भाजपत दुसरा नेता झालेला नाही.

विधानसभा अध्यक्ष कोण होणार?

विधानसभा अध्यक्षपदासाठी प्रेम कुमार आणि राम कृपाल यादव यांची नावं चर्चेत आहेत. तर प्रयोग म्हणून दीघा इथून पहिल्यांदाच आमदार झालेले संजीव चौरसीया यांनाही विधानसभा अध्यक्ष बनवलं जाऊ शकतं. पण अद्याप नेमकं कोणाच्या नावाचं पारड जड आहे हे स्पष्ट झालेलं नाही.

बिहारचा निकाल काय?

यंदा बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं २०२ जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजपला ८९ तर जेडीयूला ८५ जागा मिळाल्या आहेत. तर महागठबंधन केवळ ३५ जागांवरच समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत ज्या पक्षाची अपेक्षा त्या राजदची कामगिरी सुमार राहिली. राजदला केवळ २५ जागाच मिळाल्या. काँग्रेसनंही खराब प्रदर्शन करत केवळ ६ जागाच जिंकल्या. तर दुसरीकडं एमआयएम या पक्षानं यंदा चांगली कामगिरी करत ५ जागांवर विजय मिळवला. तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीला भोपळाही फोडता आला नाही. तर आम आदमी पार्टीला अनेक जागांवर डिपॉझिट जप्त झालं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT