NCP leaders reviewing Bihar election results after a major defeat, highlighting the setback to Ajit Pawar’s national party ambitions. The keyword Bihar election is relevant. Sarkarnama
देश

Bihar Election Result : अजितदादांच्या मनसुब्यांना 'बिहारी' झटका : राष्ट्रवादीला पुन्हा 'राष्ट्रीय' पक्ष करण्याचा प्रयत्न फेल

Ajit Pawar NCP national party status : निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दुपारी ४ वाजेपर्यंत ‘एनसीपी’च्या उमेदवारांना बिहारमध्ये केवळ ०.०२ टक्के मते, म्हणजे ८, ८९७ मते मिळाली. एनसीपीचे बहुतांश उमेदवार एक हजार मतांपर्यंतही पोहोचले नाहीत.

Jagdish Patil

Ajit Pawar NCP Setback in Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले आहे. या निकालांचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणातही जाणवू लागला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बिहारमध्ये स्वबळावर लढण्याचा मोठा फटका बसला आहे. 'एनसीपी'ला बिहारमध्ये एक टक्क्यापेक्षा कमी मते मिळाल्याचे चित्र आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार यांनी बिहारमध्ये १५ उमेदवार उतरवले होते. मात्र एकाही जागांवर आघाडी मिळू शकली नाही. त्यातील १३ उमेदवारांना इतकी कमी मते मिळाली आहेत की त्यांची अनामत रक्कमही जप्त होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दुपारी ४ वाजेपर्यंत ‘एनसीपी’च्या उमेदवारांना बिहारमध्ये केवळ ०.०२ टक्के मते, म्हणजे ८, ८९७ मते मिळाली. एनसीपीचे बहुतांश उमेदवार एक हजार मतांपर्यंतही पोहोचले नाहीत. नौटन मतदारसंघातील जयप्रकाश यांना १८६ मते, मनिहारी मतदारसंघातून सैफ अली खान यांना २०५७ मते मिळाली.

तर पारसा मतदारसंघातून बिपिन सिंह यांना ४३५ मते, महुआ मतदारसंघातून अखिलेश ठाकुर यांना ६४३ मते, राघोपुर मतदारसंघातून अनिल सिंह यांना ६०२ मते, सासाराममध्ये तर उमेदवाराला ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली आहेत. सासाराम विधानसभा मतदारसंघात एनसीपीचे उमेदवार आशुतोष सिंह यांना २१२ मते मिळाली; तर ‘नोटा’ ला ३६९ मते मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT