Dharashiv Mahayuti : राणा पाटील-प्रताप सरनाईकांनी जुळवून घेतलं; 6 नगराध्यक्षपदांची भाजप-शिवसेनेत वाटणी; दोनसाठी जोरदार रस्सीखेच

Political News : राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील सर्वच पक्षांनी नगरपालिका निवडणुकीची तयारी केली असून पहिल्यांदाच महायुतीने एकत्रित निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे.
Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Dharsahiv News : राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील सर्वच पक्षांनी नगरपालिका निवडणुकीची तयारी केली असून पहिल्यांदाच महायुतीने एकत्रित निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक व भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी बैठक घेऊन आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीमधील तीन मित्रपक्षांने एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आता सर्व कार्यकर्ते एक दिलाने तयारीला लागले आहेत.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
BJP Politics : भाजप आता मालेगावातही धमाका करण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदेंचे मंत्री दादा भुसेंचं टेन्शन वाढलं..

धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका कोण लढणार याचा फॉर्म्युलादेखील ठरला असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद कोणाकडे असणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यानुसार धाराशिव, तुळजापूर व मुरूम भाजपकडे तर कळंब, उमरगा नगरपालिका शिंदेंच्या शिवसेनेकडे असणार आहे. तर भूम, नळदुर्ग नगरपालिकेविषयी तिढा कायम आहे.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Vidarbha Shivsena: शिंदेंच्या शिवसेनेनं भांडणं टाळली; नगरपालिका अन् नगरपंचायतीच्या निवडणुकांची तीन नेत्यांवर सोपवली जबाबदारी

भूम, नळदुर्गवरून रस्सीखेच

महायुतीमध्ये जिल्ह्यातील सहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर एकमत झाले असले तरीही भूम आणि नळदुर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावरून जोरदार रस्सीखेच असल्याचे पाहावयास मिळत आहे. भूम, नळदुर्गचे नगराध्यक्ष पद शिवसेना शिंदे गट व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हवे आहे तर नळदुर्ग नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भाजप व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हवे आहे. त्यामुळे या तीन पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. विशेषतः भूममध्ये परंड्याप्रमाणे शिंदे शिवसेनेच्या विरोधात याठिकाणी ऐनवेळी सर्वपक्ष एकवटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी नळदुर्ग व भूम नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या जागा कोणाच्या वाट्याला येणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Beed NCP : डॉ. योगेश क्षीरसागरांची तिरकी चाल; राष्ट्रवादीही क्षीरसागरांना वगळून नवा पॅटर्नच्या तयारीत!

परंडा येथे सर्वपक्षीय आघाडीविरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत

परंडा येथील नगराध्यक्ष पदासाठी एकमत होण्याची शक्यता खूप कमी आहे. गेल्या पाच वर्षात याठिकाणी माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे निकटवर्तीय अध्यक्ष होते. त्यामुळे आता ही तीच परिस्थिती असल्याने येत्या काळात ही शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात परंडा शहरातील सर्वपक्ष एकवटले आहेत. भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी लढत होत आहे.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Congress Politics : बिहारमध्ये धक्का बसताच काँग्रेसचा महाराष्ट्रात मोठा निर्णय, ठाकरेंची साथ सोडली! स्वबळावर लढण्याचा नारा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com